कपिल देव यांना धर्मेंद्र यांचा भावूक संदेश | पुढारी

कपिल देव यांना धर्मेंद्र यांचा भावूक संदेश

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताचे पहिले विश्वकप विजेते कपिल देव यांची अचानक प्रकृती बिघडली होती. हृदयविकाराचा झटका आल्याने कपिल यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर कोरोनरी ॲजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली. क्रिकेट विश्वाबरोबरच सिने जगतातूनही त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आल्या. आता बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी कपिल यांच्यासाठी एक भावूक मॅसेज लिहिला आहे.  

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी कपिल देव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर कपिल देव यांचा हसतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिलंय, ‘लव्ह यू कपिल…लवकर बरा हो…तू लवकर ठिक व्हावा यासाठी मी प्रार्थना करतो.’

कपिल देव यांनी सर्जरीनंतर पहिला फोटो शेअर केला होता. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, ते आता एकदम ठिक आहेत आणि हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत आहे. या फोटोमध्ये ते रुग्णालयात बेडवर झोपलेले दिसत आहेत. या फोटोत कपिल यांची मुलगी आमियादेखील दिसत आहे. कपिल यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं, ‘मी ठिक आहे. माझी प्रकृती सुधारत आहे. गोल्फ खेळण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. तुम्ही माझे कुटुंब आहात. धन्यवाद.’ 

चित्रपट ‘८३’ मध्ये कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारत असलेल्या रणवीर सिंहनेदेखील ट्विट केलं होतं. त्याने ट्विटमध्ये लिहिलं होतं की ‘या लेजेंड्री क्रिकेटरमध्ये खूप शक्ती आणि धैर्य आहे. आपले मेन मॅन लवकर बरे होण्यासाठी कामना करतो.’

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेही त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय ‘लवकरात लवकर ठिक व्हा पाजी! @therealkapildev मी आपल्यासाठी तुमच्या गोलंदाजी आणि फलंदाजीपेक्षा अधिक गतीने रिकव्हरीची कामना करतो. लव्ह यू टू सर.’

कपिल देव यांची प्रकृती ठिक असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Back to top button