श्रीदेवीनंतर श्रध्दा कपूर बनणार ‘इच्छाधारी नागिन’ | पुढारी

श्रीदेवीनंतर श्रध्दा कपूर बनणार 'इच्छाधारी नागिन'

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

श्रीदेवी, रेखा, रीना रॉय यांसारख्या दिग्गज अदाकारांनी नागिनची भूमिका विविध चित्रपटांमध्ये साकारली आहे. आता इतक्या वर्षांनी मोठ्या पडद्यावर नागिन पुन्हा दिसणार आहे. नागिन चित्रपटासाठी श्रद्धा कपूर आता श्रीदेवी यांच्यासारखी  एका ‘इच्छाधारी नागिन’च्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते निखिल द्विवेदी सिनेरसिकांसाठी ‘नागिन’वर आधारित एक चित्रपट घेऊन येताहेत.

तीन भागांमध्ये हा चित्रपट असेल. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाने हे चित्रपट साईन केले आहेत. या चित्रपटासाठी श्रद्धा खूप एक्सायटेड आहे आणि म्हटले की, ‘नागिन’मध्ये श्रीदेवीची भूमिका पाहिली आहे आणि सुरूवातीपासूनच तिला ही भूमिका साकारायची होती. 

श्रद्धा कपूर उत्सुक 

मोठ्या पडद्यावर श्रीदेवी यांच्याशिवाय रेखा आणि रीना रॉय यासारख्या बॉलिवूड अभिनेत्रींनी ‘नागिन’ची भूमिका साकारली होती. आता या यादीत श्रद्धा कपूरचे नाव येण्यासाठी तिला मोठी संधी मिळाली आहे. याआधी २०१८ मध्ये रिलीज झालेला तिचा चित्रपट ‘स्त्री’मध्येही तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. त्यामुळे श्रद्धा नागिनच्या भूमिकेत परफेक्ट बसेल, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. 

रिपोर्ट्सनुसार ही एक प्रेम कहाणी असेल, या चित्रपटात काही स्पेशल इफेक्ट्स असून तीन भागांमध्ये याची कहाणी दाखवली जाईल.

 

 

Back to top button