लग्नानंतर काजल अग्रवालचं रोमॉटिक फोटोशूट   | पुढारी

लग्नानंतर काजल अग्रवालचं रोमॉटिक फोटोशूट  

मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘सिंघम’ फेम बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल गेल्या शुक्रवारी ( दि. ३० ऑक्टोबर) रोजी विवाह बंधनात अडकली. काजलने बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत मुंबईतील ताज हॉटेलमध्ये लग्न केलं. या विवाह सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. यादरम्यान काजल अग्रवालने लग्नानंतर दोन दिवसांतच खास फोटोशूट केलं आहे. 

काजलने आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत काजलने लंहगा परिधान केला असून तिच्या चेहऱ्यावर तेज दिसून येत आहे. ती या फोटोत हसताना आणि हळूवारपणे लाजताना ही दिसत आहे. तसेच काजल या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंसोबत काजलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माझी प्रिय व्यक्ती अनामिका खन्ना. मला या ड्रेसमधील छोटीतली छोटी गोष्ट आवडली आहे. तुमच्या या अथक परिश्रमाबद्दल माझ्याकडून मनापासून आभार. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण हा ड्रेससाठी सर्वांनी प्रेम ओतून या खास सोहळ्यासाठी बनविला. यासाठी तुमचे आभार.’  

अधिक वाचा : सिंघम फेम काजल अग्रवालच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

याआधी काजल अग्रवालने पती गौतम किचलूसोबत विवाह मंडप आणि लग्नातील मेंहदी आणि साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले होते. यातील एका फोटोत काजल गौतम किचलू यांच्या हातावर किस करताना दिसली. या फोटोसोबत काजलने कॅप्शन लिहिली होती की, ‘असेच मिसपासून ते मिसेसपर्यत! मी माझा विश्वासू जोडीदार आणि जिवलग मित्रांशी लग्न केले. यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. आता माझे सर्व काही तुम्हीच आहात.’ याशिवाय काजलने लग्नादरम्यानचा फोटो शेअर केला आहे.  


अधिक वाचा :  लग्नाळू संघटनेचा हिरमोड! सिंगम फेम काजल आज लग्नाच्या बेडीत, हळदीचे फोटोज् पाहिलात का?

(photo : kajalaggarwalofficial instagram वरून साभार)

 

 

Back to top button