चहलच्या होणाऱ्या बायकोचा इंग्लिश गाण्यावर जबरदस्त देसी ठेका! (video) | पुढारी

चहलच्या होणाऱ्या बायकोचा इंग्लिश गाण्यावर जबरदस्त देसी ठेका! (video)

भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची होणारी बायको धनश्री वर्मा सोशल मीडियावर तिच्या नृत्याने कायम घायाळ करत असते. तिचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर हवा करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. धनश्री वर्मा सध्या आयपीएलमुळे दुबईमध्ये आहे, परंतु ती तिच्या नृत्याबद्दल सतत चर्चेत असते. अलीकडेच धनश्रीने तिच्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये धनश्री इंग्रजी गाण्यांवर देसी स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये धनाश्री वर्मा डान्सची स्टाईल आणि त्याच्या मूव्हज चाहत्यांच्या होश उडवून देत आहेत. या व्हिडिओमध्ये तिने व्हाईट कलरचा टॉप परिधान केला आहे, त्याशिवाय मल्टीकलर जॅकेटसुद्धा घातले आहे. धनश्री वर्माचा हा व्हिडिओ आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. धनश्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून बरीच कमेंट केली जात आहेत आणि त्यांचा अभिप्राय दिला जात आहे.

धनश्री वर्मा व्यवसायाने डॉक्टर आहे, परंतु नृत्याच्या माध्यमातून तिने आपली जबरदस्त ओळख निर्माण करण्यात कसलीही कसर सोडली नाही. धनश्री वर्माच्या यूट्यूब वाहिनीलाही २० लाखांहून अधि सबस्क्रायबर्स आहेत. ज्याची माहिती तिने स्वत: इंस्टाग्राम स्टोरीद्वारे दिली आहे. अलीकडेच धनश्रीने युजवेंद्र चहलशी साखरपुडा केला आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होते. 

 

Back to top button