'कारभारी लयभारी'मधील रश्मी पाटील आहे तरी कोण? | पुढारी

'कारभारी लयभारी'मधील रश्मी पाटील आहे तरी कोण?

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

छोट्या पडद्यावरील ‘कारभारी लयभारी’ या नवीन मालिकेत शोना नावाचे एक पात्र आहे. हिची भूमिका मालिकेत खूप महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या प्रोमोमध्ये एक महिला दाखवण्यात आली होती. परंतु, तिचा चेहरा आणि ओळख दोन्ही गुलदस्त्यात होते. तुम्हाला माहिती आहे का, सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री शोना कोण आहे? 

कारभारी लयभारी या मालिकेतील शोनाचे खरे नाव आहे- रश्मी पाटील आहे. रश्मी पाटील ही पुण्यात राहते. तिला अभिनयाची आवड तर आहेच, शिवाय ती एक उत्तम डान्सर आहे. ती लावणीदेखील उत्तम करते. 

मालिकेच्या प्रोमोतदेखील ती लावणीच्या वेशभूषेत दिसते. 

कारभारी लयभारीचा मुख्य अभिनेता राजवीर अर्थातच निखिल चव्हाण, अभिनेत्री पियू (अनुष्का सरकटे) आणि शोना (रश्मी पाटील) या त्रिकुटांभोवती मालिकेची कहाणी आहे.  

रश्मीचे सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोही पाहायला मिळतात.

तिच्या लावणीचे अनेक व्हिडिओजही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

Back to top button