‘करण जोहरने माझ्या चित्रपटाचं नाव चोरले’ | पुढारी

'करण जोहरने माझ्या चित्रपटाचं नाव चोरले'

मुंबई : पुढारी ऑनलाईन  

मागील आठवड्यात करण जोहरने आपल्या वेब रिॲलिटी शो ‘द फॅबुलस लाईव्स ऑफ बॉलिवूड वाईव्स’चा ट्रेलर रिलीज केला होता. याचे स्ट्रीमिंग ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर होणार आहे. आता चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी त्याच्यावर आणि त्याची कंपनी धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहतावर आरोप केला आहे की, करणने त्याच्या वेब शोसाठी त्याच्या चित्रपटाचे नाव चोरले आहे. मधुर भंडारकरने ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. 

भांडारकरांनी लिहिले आहे की, “प्रिय करण जोहर! आपण आणि अपूर्व मेहता यांनी माझ्याकडे ‘बॉलिवूड वाईव्स’ची टायटल मागितले होते. परंतु, मी नकार दिला होता. कारण, माझ्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. परंतु, आपण हे चुकीचे आहे की, आपण ‘द फॅबुलस लाईव्स ऑफ बॉलिवूड वाईव्स’चा वापर केला. प्लीज माझा प्रोजेक्ट बाद करू नका. माझी आपणास विनंती आहे की, आपण टायटल बदला.”

IMPPA मध्ये धर्मा प्रोडक्शनची तक्रार 

सोशल मीडियावर आपले दु: ख व्यक्त करण्याबरोबरचं मधुर भंडारकरने इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPPA) मध्येदेखील धर्मा प्रोडक्शनविरोधात तक्रार दाखल केली आहे. IMPPA चे म्हणणे आहे की, त्यांनी करण जोहरला त्याच्या वेब शोसाठी टायटल जारी केलेलं नाही. रिपोर्ट्सनुसार, असोसिएशनने या संदर्भात धर्मा प्रोडक्शन आणि नेटफ्लिक्सला पत्र लिहून टायटल बदलण्यास सांगितले आहे. 

करण जोहर किंवा अपूर्व मेहता यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यांच्या वेब शोमध्ये बॉलिवूड कलाकारांच्या पत्नींच्या आयुष्याबाबत सागितलं जाणार आहे. 

Back to top button