अभिनेत्री नेहा महाजनचा सातासमुद्रापार डंका! | पुढारी

अभिनेत्री नेहा महाजनचा सातासमुद्रापार डंका!

मुंबई: पुढारी ऑनलाईन

मराठमोठी अभिनेत्री नेहा महाजन काही ना काही कारणास्तव नेहमी चर्चेत असते. नुकतेच आणखी एका खास कारणाने नेहा महाजन चर्चेत आली आहे. नेहासाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच नेहा उत्तम सितार वादक आहे. तिच्या याच कलेने तिचा डंका साता समुद्रापार वाजवला आहे. नेहा महाजन आणि लॅटीन पॉप किंग रिकी मार्टीन यांच्या ‘Pausa’ या अल्बमला मानाच्या ‘ग्रॅमी’  पुरस्कारांत नॉमिनेशन मिळाले आहे. 

नेहा व रिकी यांच्या ‘Pausa’ या अल्बमला सर्वोत्कृष्ट लॅटिन पॉप विभागात नामांकन मिळालं आहे. नेहा उत्तम सितारवादक असून तिने तिच्या वडिलांकडून सितारवादनाचे धडे घेतले आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत नेहाने नामांकनाची मोठी बातमी चाहत्यांना सांगितली. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, नेहाने एका मुलखतीमध्ये लॅटीन पॉप किंग रिकी मार्टीन यांच्यासोबत गाण्याची संधी कशी मिळाली हेदेखील शेअर केल आहे.  ‘जानेवारी महिन्यात रिकीकडून या गाण्यासाठीचा फोन मला आला. ज्यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत सितार वादन करशील का, असे मला विचारण्यात आले. मुळात रिकीला मी शाळे असल्यापासून ऐकत होते. त्यात संगीतामध्ये रागसंगीताकडे माझा ओढा जास्त होता. त्यामुळे मी पटकन होकार दिला. त्यामुळे त्याच्या निमित्ताने काहीतरी नवे शिकण्याची संधी मला मिळाली. 

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याकारणाने नेहाने मुंबईतच तिच्या पद्धतीने या गाण्याच्या गरजेनुसार सितारवादनाची तयारी केली. प्रसन्ना विश्वनाथन या साऊंड रेकॉर्डिस्टच्या मदतीने तिने हे सितार वादन रेकॉर्ड करत ते रिकीपर्यंत पोहोचवले होते. 

Back to top button