सैफ करीना ट्रोल झाले कारण जेहचा जहांगीर झाला | पुढारी

सैफ करीना ट्रोल झाले कारण जेहचा जहांगीर झाला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवुड अभिनेत्री करीना कपूर खान यावर्षी फेब्रुवारी मध्ये दुसऱ्यांदा आई झाली आहे. करीना आणि सैफ यांच्या दुसऱ्या मुलाच नाव काय असणार याची चर्चा सुरु आहे. नूकतीच अशी बातमी आली आहे की या दोघांनी लहान मुलाचे नाव जेह ठेवले आहे. करीनाने जोहरच्या सहकार्याने नुकतेच तिचे पुस्तक लाँच केले आहे. या पुस्तकात अभिनेत्री करीनाने तिच्या गर्भधारणेचा संपूर्ण अनुभव शेअर केला आहे.

याच पुस्तकामध्ये  शेवटच्या पानावर करीना कपूर ने आपल्या छोट्या मुलाचे नाव ‘जेह’ अस लिहलं आहे. पण नंतर शेवटी करीनाने चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे. तिचे गर्भधारणा आणि गर्भधारणानंतरचे फोटो पुस्तकाच्या शेवटच्या पानावर दाखवण्यात आले आहेत. आणि त्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये करीनाने दुसऱ्या बाळाचे नाव जहाँगीर अस सांगीतल आहे.

तैमुरच्या या नावावररून वाद उफाळला होता

करिनाने पहिल्या बाळाचे नात तैमूर ठेवल्यानंतर चांगलाच वादंग निर्माण झाला. अनेक महिने या नावाचा वादंग सुरू होता. तुर्की क्रूरकर्माच्या नावावरुन हे नामकरण झाल्याचं म्हटले जात होते.

एका मुलाखतीमध्ये बोलताना यावर करिना म्हणाली, ‘तैमूरच्या नावावरुन वादंग माजल्यानंतर सैफ घाबरला होता. तैमूरच्या जन्मावेळी मी हॉस्पिटलमध्येच होते. तैमूर नावामुळे खूप वाद होत असल्याचं सैफने मला सांगितलं.

आम्हाला ट्रोल केलं जात असल्याचंही सैफ म्हणाला. सैफला तैमूरचे नाव बदलून फैज ठेवायचं होतं. फैज हे नाव जास्त रोमँटिक आणि काव्यात्मक असल्याचं सैफ म्हणाला होता.’ असे करिना सांगते.

‘मी सैफला ठाम नकार दिला. मी ठरवलं होतं, जर मुलगा झाला, तर तो लढवय्या असेल. तैमूर म्हणजे लोह. मी एका लोहपुरुषाला जन्म देणार. तैमूर नावाचा मला अभिमान आहे.’ अशा शब्दात करिनाने आठवणींना उजाळा दिला.

तर, यावर सैफ म्हणाला, “माझ्या बाळाचं नाव तुर्की राज्यकर्त्यावरुन ठेवण्यात आलेलं नाही. मला त्या राजाविषयी पूर्ण माहिती आहे. त्याचं नाव तिमूर होते, माझ्या मुलाचे नाव तैमूर आहे. कदाचित नावाचा उगम एकच असेल, पण नाव सारखं नाही,” असं सैफ अली तैमूरच्या जन्माच्या महिन्याभरानंतर म्हणाला होता.

तैमुरचा अर्थ काय?

तैमूर हे पर्शियन भाषेतील अत्यंत जुनं नाव असल्याचे सैफ अली खानने सांगितले होते. तैमूरचा अर्थ लोह किंवा लोखंड. मला आणि करिनाला या शब्दाचा उच्चार आणि अर्थ भावला. आम्ही काढलेल्या असंख्य नावांपैकी तिला हेच सगळ्यात जास्त आवडलं. या नावाला वजन आहे, असं सैफने सांगितलं होते.

माझ्या एका लांबच्या भावाचं नाव तैमूर आहे. मी त्याच्यासोबत लहानाचा मोठा झालो. माझ्या मोठ्या मुलीचं, म्हणजे साराचं नावही आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावरुन ठेवलं होतं, अशी आठवणही सैफने सांगितली होती.

हे ही वाचलत का :

Back to top button