WhatsApp वापरणाऱ्यांची डोकेदुखी वाढणार; अॅपमध्ये केले हे बदल

file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : WhatsApp ने काही दिवसांपूर्वी बीटा 2.21.16.9 हे वर्जन रोल आऊट केलं होत. अँड्राॅइड सेंट्रलच्या एक अहवालनूसार हे लेटेस्ट अपडेट स्मार्टफोनमधून जुने चॅटींग डिलीट करत आहे. WhatsApp मध्ये बीटा 2.21.16.9 वर्जन अपडेट केल्यांनतर अपडेटच्या अगोदरचे चॅटींग डिलीट होत आहे. अपडेट केल्यानंतर 25 मेसेजेस फक्त दिसतात.

अँन्ड्राइड सेंट्रलने प्रकाशित केलेल्या एका अहवालानूसार, चॅटींग हिस्ट्री अजुनही अॅक्सेस करता येते. याचा अर्थ आपण जुने मेसेज सोधत असतो, तेव्हा अॅप त्याला दाखवू शकते. दरम्यान तुम्ही संभाषणामध्ये वरती स्क्रोल करण्याचा प्रयत्न केला तर त्या मेसेज पर्यंत पोहचु शकणार नाही.

file photo
file photo

WhatsApp बीटा 2.21.16.9 वर्जन स्मार्टफोनवरुन जुने मेसेज हटवत आहे

जर तुम्ही WhatsApp बीटा 2.21.16.9 वर्जन वापरत असाल तर तुम्ही चॅटींग मधील फक्त 25 मेसेज वाचू शकता. त्यापेक्षा जास्त जुने मेसेज वाचू शकमार नाही. हे अपडेट जुने चॅटींग हटवत आहे. जर तुम्ही सर्च फिचरचा वापर करत असाल तर जुन्या चॅट अॅक्सेस करु शकता. जर तुम्ही स्क्रोल करुन जुने मेसेज पाहण्याचा प्रयत्न केला तर जुने मेसेज पाहायला मिळणार नाहीत.

WhatsApp वर आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग

WhatsApp नेहमी नव नवीन बदल करते. वापरकर्त्यांना जास्तीत जास्त फिचर्स देण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता WhatsApp च्या मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरबाबत मोठी चर्चा आहे. हे फीचर रोलआउट करण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. आता वापरकर्ता या फीचरच्या मदतीने फोनशिवाय इतर चार वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये एकाच वेळी व्हॉट्स ॲप वापरु शकणार आहेत.

फोन अ‍ॅक्टिव्ह नसताना किंवा इंटरनेट कनेक्टेड नसतानाही वापरकर्ता इतर डिव्हाईस लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्स ॲप वरती चॅटींग करू शकतात. पण दुसऱ्या डिव्हाईसवर व्हॉट्स ॲप ॲक्सेस करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेच आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरची मध्ये या खास गोष्टी आहेत.

आता वापरकर्ते फोनमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसल्यासही व्हॉट्स ॲप चं डेस्कटॉप किंवा वेब वर्जन सुरू राहील. नवं फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरू केलं आहे. अस व्हॉट्स ॲपचे प्रमुख विल कॅथकार्टने यांनी माहिती दिली आहे. ही माहिती त्यांनी ट्विटर वरुन दिली आहे.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतंच : विश्वास नांगरे -पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news