पॉर्न व्‍हिडीओ रॅकेट प्रकरण : राज कुंद्रा याचा कारागृहातील मुक्‍काम वाढला

Raj Kundra
Raj Kundra
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टीचा पती आणि पॉर्न व्‍हिडीओ रॅकेट प्रकरणातील मुख्‍य संशयित आरोपी राज कुंद्रा याच्‍या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्‍हा टळली आहे. यामुळे राज कुंद्रा याचा कारागृहातील मुक्‍काम २० ऑगस्‍टपर्यंत वाढला आहे.

मुंबई पोलिसांनी पॉर्न व्‍हिडीओप्रकरणी कुंद्राला १९ जुलै रोजी रात्री उशीरा अटक केली होती. तर २० जुलै रोजी कुंद्राच्‍या कंपनीतील सहकारी रायन थोर्प यालाही अटक केली होती.

अटकेकंतर शिल्‍पा शे्‍ट्‍टीने वारंवार पतीच्‍या जामीनासाठी प्रयत्‍न केले. मात्र न्‍यायालयाने जामीन फेटाळले.

याप्रकरणी शर्लिन चोप्रा आणि गहना वशिष्‍ठ या दोघांचीही चौकशी झाली आहे.

कुंद्रा याला अटक केल्‍यानंतर व्‍हॉटस् ॲपच्‍या माध्‍यमातून कुंद्रा हा पॉर्न व्‍हिडीओची निर्मिती करुन कोट्यवधी रुपये कमवत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार पॉर्न चित्रपट व व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून राज कुंद्रा दररोज सुमारे ८ आठ लाख रुपयांची कमाई करत असल्‍याची माहितीही तपासात समाेर आली हाेती.

आर्थिक फसवणुकीच्‍या आरोपामुळे शिल्‍पा शेट्‍टी अडचणीत

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी

पती राज कुंद्राच्‍या पॉर्न व्‍हिडीओ रॅकटेप्रकरणी चौकशीच्‍या भोवर्‍यात सापडलेली अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टीच्‍या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

कंपनी स्‍थापन करण्‍याच्‍या नावा खाली अभिनेत्री शिल्‍पा शेट्‍टी व तिची आई सुनंदा शेट्‍टींवर कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे.

शिल्‍पा व तिची आई सुनंदा यांनी 'आयोसिस स्‍लिमिंग स्‍किन सलून व स्‍पा' नावाने कंपनी सुरु केली. याची एक शाखा राजधानी दिल्‍लीत सुरु करण्‍याची घोषणाही केली.

ही शाखा सुरु करण्‍यासाठी कंपनीच्‍या अधिकार्‍यांनी कोट्यवधी रुपये घेतले असल्‍याची तक्रार विभूतिखंड पोलिस ठाण्‍यात ज्‍योत्‍सना चौहान तर हजरतगंज पोलिस ठाण्‍यात रोहित वीर सिंह यांनी केली होती. या दोन्‍ही तक्रारीची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे.

कोट्यवधी रुपयांच्‍या फसवणूक प्रकरणाच्‍या तपासात शिल्‍पा शेट्‍टी व सुनंदा शेट्‍टी यांचे नाव समोर आले.

या प्रकरणी एक महिन्‍यांपूर्वी दोघींना नोटीसही पाठवली असल्‍याचे हजरतगंज पोलिसांनी स्‍पष्‍ट केले हाेते.

पती राज कुंद्राच्‍या पॉर्न व्‍हिडीओ रॅकटेप्रकरणी शिल्‍पा शेट्‍टीची चौकशी झाली आहे. तिने आपल्‍या या प्रकाराची माहिती नसल्‍याचा दावा केला आहे. तसेच एक निवदेन प्रसिद्‍ध करत याप्रकरणी आपल्‍या कुटुंबावर निराधार आरोप करु नयेत, माझ्‍या मुलांची प्रायव्‍हसी जपावी, असे आवाहनही तिने केले होते. आता आर्थिक फसणवूक प्रकरणी शिल्‍पा शेट्‍टी पुन्‍हा एकदा अडचणीत आली आहे.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ :बदलती शिक्षण पद्धती स्वीकारा – डॉ. अरुण पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news