धर्मांतर प्रकरण : पुसदच्या डॉक्टरला उत्तर प्रदेशच्या एटीएसकडून अटक | पुढारी

धर्मांतर प्रकरण : पुसदच्या डॉक्टरला उत्तर प्रदेशच्या एटीएसकडून अटक

पुसद (यवतमाळ); पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरण यातील आर्थिक संबंध असल्याच्या संशयातून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)पुसद येथील शिवाजी चौकातून एका डॉक्टरला रविवारी (दि,८) रात्री उशिराने ताब्यात घेतले. या कार्यवाहीमुळे पुसद परिसरात खळबळ उडाली आहे.

डॉ. फराज शाह असे उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने ताब्यात घेतलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील एटीएसच्या पथक रविवारी यवतमाळमध्‍ये दाखल झाले. शहरातील शिवाजी चौकात असलेल्या दवाखान्यातून डॉ. फराज शाह यांना ताब्यात घेतले. या घटनेची नोंद वसंतनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. डॉ. शाह यांना ताब्यात घेतल्यानंतर पथक उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना झाले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही

उत्तर प्रदेशातील एटीएसच्या पथकाने ही कार्यवाही न्यायालयाच्या आदेशावरून केल्याचे समजते. तीन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये धर्मांतर प्रकरण पुढे आले आहे. याच प्रकरणाशी आर्थिक संबंध असल्याच्या संशयातून डॉ. शाह यांच्यावर ही कार्यवाही केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

पाहा : बदलती शिक्षण पद्धती स्वीकारा – डॉ. अरुण पाटील 

Back to top button