‘हुस्न है सुहाना’ गाणे रिलीज, वरुण-साराची धमाल | पुढारी

'हुस्न है सुहाना' गाणे रिलीज, वरुण-साराची धमाल

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेता वरुण धवनचा आगामी ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट जोरदार चर्चेत आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून कुली नंबर 1 चित्रपट सतत ट्रेंड आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला पसंती दिली जात आहे, तर कधी ट्रोलचा सामना करावा लागत आहे. आता कुली नंबर 1 चे आणखी एक गाणे रिलीज झाले आहे. ‘हुस्न है सुहाना’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

आजपासून 25 वर्षांपूर्वी सुपरस्टार गोविंदाने करिश्मा कपूरसोबत ‘हुस्न है सुहाना’ या गाण्यावर असा डान्स केला होता की सर्वांना या गाण्यावर नाचण्यास भाग पाडले होते. त्या गाण्यात गोविंदाची टिपिकल नृत्यशैली दिसली, ज्यावर सर्व चाहते गोविंदावर फिदा झाले होते. आता इतक्या वर्षांनंतर त्याच गाण्याचा रिमेक वरुण धवन करत आहे. त्याची तुलना गोविंदाशी करणे चुकीचे ठरेल, परंतु या गाण्यावर वरुण धवननेही एक उत्कृष्ट नृत्य केले आहे. या गाण्यात सारा अली खान सोबत वरूणची जोडी चांगली जमली आहे. 

यापूर्वी ‘तेरी भाभी’ या गाण्याने सोशल मीडियावर धमाल केली होती. त्याचवेळी वरुण आणि साराच्या टपोरी स्टाईल डान्सनेही सर्वांना प्रभावित केले. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवनसाठी खास आहे. त्यांचा हा ४५ वा चित्रपट आहे. धवन यांनी आपल्या मुलाबरोबर पूर्ण आत्मविश्वासाने हा चित्रपट बनविला आहे. मूळ चित्रपटात त्यांनी गोविंदासोबत धमाल केली होती. आता २५ वर्षानंतर आपल्या मुलासोबत तशी धमाल करणार आहे. २५ डिसेंबर रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

Back to top button