HBD Sonalee Kulkarni : हॉट कपलचं समुद्रकिनारी किसिंग फोटोशूट | पुढारी

HBD Sonalee Kulkarni : हॉट कपलचं समुद्रकिनारी किसिंग फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क

सोनाली कुलकर्णीने (HBD Sonalee Kulkarni ) पती कुणालसोबतचा सर्वात बोल्ड फोटो शेअर केला आहे. मेक्सिकोमध्ये हनीमून साजरा करायला गेलेल्या सोनालीने समुद्राच्या वाळूत कुणालसोबत फोटोशूट केला आहे. तिने काही निवड फोटोदेखील चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (HBD Sonalee Kulkarni)

एका फोटोत ती कुणालला किस करताना दिसतेय. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने कुणालसोबत सेल्फी घेतला घेतला आहे. तिसऱ्या फोटोमध्ये दोघे झोपाळ्यावर बसून हसताना दिसताहेत. तिने या फोटोंसोबत कॅप्शन लिहिलीय- en nuestra luna de miel 👩🏻‍❤️‍👨. याचा मराठीत अर्थ आहे की ‘आमच्या मधुचंद्रावर.’ सोबतचं तिने #honeymoondiaries #mrandmrs #kunalbenodekar @kb_keno #sonaleekulkarni #kensona #mexico #cancun #holbox असे हॅशटॅगही दिले आहेत.

विशेष म्हणजे सोनालीचा १८ मे रोजी वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! सोनालीने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. सोनालीचा जन्म १८ मे १९८८ रोजी पुण्यात झाला. आज तिने ३४ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘बकुळा नामदेव घोटाळा’ या चित्रपटातील तिची भूमिका गाजली. शिवाय नटरंगमध्येही तिने अफलातून अभिनय केला आहे. याच चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या प्रसिद्ध गाण्यातही सोनालीचे खूप कौतुक झाले होते. या गाण्यातून सोनालीला तिची खरी ओळख मिळाली आणि ती प्रसिद्धीच्या झोतात आली. हंपीमध्येही तिची उत्तम भूमिकाही पाहायला मिळाली होती.

सोनालीने ३० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच ती बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे. सोनालीने ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. यानंतर ती सिंघम रिटर्न्स आणि होप आणि हम या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

सोनाली तिच्या चित्रपटांसोबतच हॉट फोटोंमुळेही चर्चेत असते. अनेकदा त्याचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button