अमिताभ बच्चन यांनी शेअर केला लग्नातील खास फोटो | पुढारी

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला लग्नातील खास फोटो

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या आज लग्नाचा ४८  वा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

अमिताभ आणि जया बच्चन यांनी १९७१ रोजी रिलीज झालेला गुड्डी याचित्रपटात सर्वप्रथम काम केले होते. हृषिकेश मुखर्जी यांच्या या चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. ‘एक नजर’ (१९७२) या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यामधील नातं आणखी घट्ट झालं. अखेर ३ जून, १९७३ रोजी अमिताभ आणि जया बच्चन यांनी लग्न केलं. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ हे जया यांच्यासोबत लग्नाआधी परदेशवारी करणार होते; पण वडिलांनी आधी लग्न, मग परदेशात फिरायला जा, असे सांगितल्यानंतर त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. 

अमिताभ यांनी हा फोटो शेअर करून कॅप्शन दिली की, “३ जून १९७३…आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छाबद्दल सर्वांचे आभार.”

बिग बींच्या या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडतोय. बिपाशा बासू, सोनल चौहान, दिया मिर्झा, नेहा धुपिया यासारख्या कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अमिताभ बच्चन अनेकदा आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांना शेअर करत असतात. त्यामध्ये फोटो आणि व्हिडिओही असतात. त्याचबरोबर, त्या फोटोमागचा किस्सा, इतिहासही सांगतात. 

 

Back to top button