शरद पवारांवरील टीका कधीच सहन करणार नाही : जितेंद्र आव्हाड - पुढारी

शरद पवारांवरील टीका कधीच सहन करणार नाही : जितेंद्र आव्हाड

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांवर केलेली टीका कधीच सहन करणार नाही, असे प्रतिपादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. पवारांवरील टीका म्हणजे विकृती, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी त्या अभिनेत्रीचे नाव न घेता केली.

आव्हाड म्हणाले, पवारांवरील टीका सहन करणार नाही. पवारांविरोधात ट्विट करणारा निखिल भामरे दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात आहे. पवारांवरील टीका कार्यकर्ते कशी सहन करणार? अशा भाषेतील टीका सहन करणार नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. इतक्या खालच्या पातळीला जाऊन विरोध कधीच नसावा.

केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, केतकी विरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा पोलिसांनी ५००, ५०५ (२) आणि १५३ A अशी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नटके यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे.
केतकीने आपल्या फेसबूक अकाऊंटवर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. कवितेच्या ओळी लिहित तिने शरद पवारांवर टीका केली होती.

“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll”

या कवितेखाली -Advocate Nitin Bhave असे लिहिलेले आहे.

Back to top button