नाशिक : वाहतूक पोलिस कर्मचार्‍याला शिवीगाळ ; एकाला 6 महिने साधा कारावास - पुढारी

नाशिक : वाहतूक पोलिस कर्मचार्‍याला शिवीगाळ ; एकाला 6 महिने साधा कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहतूक पोलिस कर्मचार्‍याला शिवीगाळ तसेच धक्काबुक्की करणे एका वाहनधारकाला महागात पडले आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी संबंधित वाहनधारकाला 6 महिने साधा कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राजेंद्र बळीराम सोनवणे (54) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत 5 जानेवारी 2019 रोजी पाथर्डी फाटा येथे शहर वाहतूक शाखेचे पोलिस नाईक सचिन गोपाळ जाधव हे कर्तव्य बजावत होते. पाथर्डीगावाकडून अंबडच्या दिशेने जाणार्‍या राजेंद्र बळीराम सोनवणे (54) व सुनील धनू जाधव (38) यांच्या ताब्यातील मारुती स्विफ्ट वाहनाने (एमएच 15, डीसी 5183) अपघात केला. पोलिस नाईक जाधव यांनी स्विफ्ट कारमध्ये बसून चौकीला घेण्यास सांगितले होते. दोन्ही संशयितांनी जाधव यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करीत अंबडच्या दिशेने पळवून नेले.

पोलिस नाईक जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम. डी. म्हात्रे यांनी आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

हेही वाचा :

Back to top button