यवतमाळ : बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास तिहेरी जन्मठेप; ६० दिवसांत निकाल

यवतमाळ : बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास तिहेरी जन्मठेप; ६० दिवसांत निकाल

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: सहा वर्षाच्या मुलीवर अत्‍याचार करणार्‍या आराेपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश दारव्हा यांनी आरोपीला तिहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीला ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. संजय उर्फ मुक्या मोहन जाधव (वय २४) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबतची सविस्तर माहितीनुसार, १३ मार्च रोजी संजय जाधव याने  सहा वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर कोणाला काही सांगू नको असे सांगत धमकीही दिली. मुलीची आई मजुरी करून घरी परत आल्यानंतर मुलीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. आईने आर्णी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली.

पाेलिसांनी अत्‍याचार पीडित बालिकाव आरोपी यांची वैद्यकीय तपासणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश दारव्हा हलमनवर यांच्या न्यायालयात १२ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीला बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदानुसार आजीवन कारावास, कलम ३७६ अंतर्गत आजीवन कारावास आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार आजीवन कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news