Rupali Patil Thombare : 'महिला असली तरी छपरीच तू', केतकी चितळे झाली प्रचंड ट्रोल; कमेंट्सच्या 'नरक यातना' सोशल मीडियावर! - पुढारी

Rupali Patil Thombare : 'महिला असली तरी छपरीच तू', केतकी चितळे झाली प्रचंड ट्रोल; कमेंट्सच्या 'नरक यातना' सोशल मीडियावर!

पुढारी ऑनलाईन डेस्क

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी अर्वाच्च आणि आक्षेपार्ह टीका केल्याने अभिनेत्री केतकी चितळे प्रचंड ट्रोल झाली आहे. नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर चांगलेच निशाण्यावर धरले आहे. केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक कविता लिहून शरद पवार यांच्यावर टीका केलीय. (Rupali Patil Thombare) दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि झाशीची राणी प्रतिष्ठानच्या संस्थापिका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून केतकी चितळेला धारेवर धरले आहे. (Rupali Patil Thombare)

संपूर्ण प्रकरण काय आहे पाहा-

“तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll”

अशी वादग्रस्त पोस्ट करून केतकीने शरद पवार यांच्यावर टीका केलीय. यामध्ये तिने खूप असभ्य भाषा वापरली असून अर्वाच्च भाषेत निंदा करण्यात आली आहे. या कवितेखाली -Advocate Nitin Bhave असे लिहिले आहे.

यानंतर सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर लिहिले आहे-

चि चि चवताळीस बाई तू
महिला असली तरी छपरीच तू,
संस्कार नसलेली केतकी,
इतकीशी कशी चवताळीस
हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहिजे.
कशात ना मशात केतकीबाई तमाशात,
लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला, मिळणारच बाई तुला चोप
#सडकी #केतकी #चितळे

ट्रोलर्सनी केतकीला खरे खोटे सुनावले

निषेध, आता हे एका महिलेचे trolling नव्हे काय… म्हणे आम्ही संविधान पाळतो.., ताई, पोरिने कविता करून आख्खी पार्टी कामाला लावलीय., हिला कोणी कुत्रं पण विचारत नाही म्हणून काहीतरी स्टंट करते, रुपालीताई सोडून या जगात बाकी सगळे विकृत आहेत., ताई तुम्ही केस करा या विकृत बाईवर एकाही विकृताला सोडू नका….., करेक्ट कार्यक्रम केलाय पोरीने , ताई नुस्त बोलून होणार नाही हिला हिची जागा दाखवावी लागेलच, ताई तुमच्या स्टाईलने हिला दाखवा एकदा हिसका., रुपालीताई तुमच्या हातून तिला मनसोक्त चोपण्याचा व्हिडीओ लवकरच प्रदर्शित होवो….ह्याच शुभेच्छा!. चितळेच्या चेटकीनीला …, हो तर बोलली ना ती, माझ्याकडे पुरावा आहे. रुपालीताई उगाच नाही रागवत कुणावर. ….,……..?, मी परत परत वाचतोय कविता खूप बेकार लिहून ठेवली आहे निषेध निषेध…. अशा प्रकारच्या कमेंट्स करून ट्रोलर्सनी केतकीला खरे खोटे सुनावले आहे.

या कमेंट्स रुपाली पाटील यांनी फेसबूक पोस्ट केल्यानंतर आल्या आहेत.

Back to top button