Deepika Padukone : दीपिकाचं स्लिम ट्रीम बॉडीचं काय आहे रहस्य?

deepika padukone
deepika padukone
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड विश्वात ग्लॅमरस दिसण्यासाठी अभिनेत्रींना खूप मेहनत घ्यावी लागते. स्वत:ला सिध्द करण्यासाठी कौशल्यासोबतचं फिटनेस आणि सुंदरही असणं खूप महत्त्वाचं आहे. हेच कारण आहे की, अभिनेत्री आपल्या फिटनेसविषयी खूप जागरूक असतात. बॉलीवूडमध्ये अशा काही अदाकारा आहेत, ज्यांनी पस्तीशी पार केली आहे. तरीदेखील त्यांचं सौंदर्य आणि फिटनेस टिकून आहे. यापैकी एक आहे – दीपिका पादुकोन. (Deepika Padukone) चित्रपटांतील मुख्य भूमिका असो वा बॉलीवूड इंडस्ट्रीच्या पार्ट्या , दीपिका आपल्या लुक्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेते. अनेक कमी वयाच्या अभिनेत्रींनादेखील ती मात देते, असा तिचा फिटनेस आहे. तिने लेटेस्ट फोटोज इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत. सोशल मीडियावरदेखील ती आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहते. तुम्हाला माहितीये का, तिचं स्लिम दिसण्यामागचं रहस्य? (Deepika Padukone)

वयाच्या ३६ व्या वर्षीही फिट

दीपिकाचं सौंदर्याचं आणि फिटनेसचं रहस्य म्हणजे योग होय. विविध योगासने करण्याची कला तिला अवगत आहे. लवचिक बॉडीमुळे ती परफेक्ट योगासने करू शकते. त्याचीच एक झलक तिने शेअर केलेल्या फोटोंमधून दिसते. तिने काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. निवडक फोटोंमध्ये ती योगासने करताना दिसते. यासोबतचं तिने Some Yoga Flex…? अशी कॅप्शनही दिलेली आहे. खरंतरं, तिने हे फोटोशूट एका कंपनीच्या जाहिरातीसाठी केल्या आहेत.

कान्समध्ये दिसणार

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा फिटनेस आणि अप्रतिम सौंदर्य लोकांची मने जिंकते. दीपिकाचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जातो. आता ही अभिनेत्री लवकरच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये रेड कार्पेटवर थिरकताना दिसणार आहे. याशिवाय ती ज्युरी सदस्यही असणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून कान्स महोत्सवात तिने आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

परदेशी बॅग ब्रँडची पहिली भारतीय ब्रँड ॲम्बेसडर

दीपिका ही लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनची पहिली भारतीय ब्रँड अॅम्बेसेडर झाली आहे. Dauphine बॅगसाठी लुई विटॉनच्या नव्या कलेक्शनचा हिस्सा आहे. या नव्या रेंजसाठी ती 'क्रूएला' फेम अभिनेत्री एम्मा स्टोन आणि चीनी अभिनेत्री झोउ डोंग्यु सारख्या स्टार्ससोबत सहभागी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news