वाॅशिंग्टन, पुढारी ऑनलाईन : अंतराळ शेतीमध्ये वैज्ञानिकांनी मोठी झेप घेतलेली आहे. कारण, एका छोट्याशा कुंडीमध्ये चंद्रावरील मातीत वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच काही रोपे वाढवली आहेत. अपोलो प्रोग्रॅमध्ये अंतराळवीरांनी परत ही रोपे आणली आहेत. एक दिवस थेट चंद्रावर वनस्पती वाढविणं शक्य होईल, अशी आशा गुरूवारी कम्युनिकेशन बायोलाॅजी या जर्नलमध्ये संशोधकांनी व्यक्त केली आहे. (Lunar Agriculture)
चंद्रावरील मातीत वनस्पती उगविण्याचा प्रयोग करण्याासठी संशोधकांनी अपोलो ११, १२ आणि १७ महिमेदरम्यान विविध ठिकाणांहून माती गोळा केलेली होती. केवळ १२ ग्रॅमच चंद्रावरील माती या प्रयोगात वापरण्यात आली आहे. अगदी लहान भांड्यामध्ये १ ग्रॅम माती (रेगोलिथ) घेतली. त्यानंतर त्या मातीत बिया ठाकल्या आणि पाणी टाकण्यात आले. रोपांना हवे असलेले पोषक द्रावणंदेखील देण्यात आली.
या प्रयोगामध्ये हिरव्या भाज्यांशी संबंधित असलेली अरेबिडोस्पिस थालियानाची लागवड करण्यात आली होती. कारण, ही वनस्पती सहज वाढते. त्याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये अवकाशातील वातावरणाला वनस्पतीने दिलेला प्रतिसाद याचा अभ्यास करण्यात आला. केवळ दोन दिवसांनतर त्या बियांना अंकुर फुटले. (Lunar Agriculture)
या प्रयोगाशी संबंधित असलेल्या अन्नालिसा पाॅल म्हणाल्या की, "जशी नेहमीची वनस्पती असते, तशीच ही वनस्पती चंद्राच्या वातावरणात राहून ६ दिवसांपर्यंत दिसत होती. पण त्यानंतर रोपांमध्ये फरत दिसू लागला. हळुहळू ती रोपे वाढू लागली. २० दिवसांनंतर शास्त्रज्ञांनी रोपांची कापणी करून त्याच्या डीएनएवर अभ्यास केला."
पहा व्हिडीओ :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबवडे गावाला राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद