शिल्पाचा सोशल मीडियाला ‘गुड बाय’! | पुढारी

शिल्पाचा सोशल मीडियाला ‘गुड बाय’!

पुढारी ऑनलाईन डेस्क

शिल्पा शेट्टीचे अनेक चाहते आहेत आणि ती सोशल मीडियात सक्रिय राहून आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कातही असे. आता मात्र तिने सोशल मीडियाला ‘गुड बाय’ केले आहे. तिने एक शेवटची पोस्ट लिहून आपण सोशल मीडियातून दूर होत असल्याचे सांगितले. सततच्या एकसुरीपणामुळे (मोनोटोनी) मी कंटाळले आहे. सगळं एकसारखंच दिसत आहे. जोपर्यंत मला एक नवा अवतार मिळत नाही, तोपर्यंत मी सोशल मीडियातून दूर जात आहे, असे तिने यामध्ये म्हटले आहे. शिल्पाची सोशल मीडियात तगडी फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तिला 25.4 दशलक्ष लोक फॉलो करतात तसेच ट्विटरवर तिचे 6.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. शिल्पा सध्या गोव्यात रोहित शेट्टीची वेब सीरिज ‘इंडियन पुलिस फोर्स’चे शूटिंग करीत आहे.

Back to top button