"तुम्हालाही औरंगजेबाच्या कबरीत जावे लागेल...", संजय राऊत यांची अकबरुद्दीन ओवेसींवर खोचक टीका | पुढारी

"तुम्हालाही औरंगजेबाच्या कबरीत जावे लागेल...", संजय राऊत यांची अकबरुद्दीन ओवेसींवर खोचक टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क: “तुम्हालाही त्याच कबरीत जावे लागेल. औरंगजेबाला याच मातीत गाडलं होत हे लक्षात ठेवा. औरंगजेबच्या कबरीचे दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही.” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एमआयएमचे वरिष्ठ नेते अकबरूद्दीन ओवेसी यांच्यावर केली आहे. एमआयएम नेते आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबच्या खुलताबाद येथील कबरीचे दर्शन घेतले. त्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.

कश्मिरातलं वातावरण बिघडविण्याचे काम सुरू आहे. आम्ही संवेदनशीलपणे या विषयाकडे पाहतोय. मोदी आणि शहा यांनी राजकारण बाजूला ठेवून याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. काश्मीर पंडितांच्या हत्येवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. जम्मू-काश्मीरातील बडगाममध्ये दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची हत्या केली. यावर राऊत यांनी भाष्य केले आहे.

हेही वाचा

Back to top button