“दोन वेळा पंतप्रधान झालात, पुढे काय?”, मोदींनी उत्तरात शरद पवारांवर साधला निशाणा

“दोन वेळा पंतप्रधान झालात, पुढे काय?”, मोदींनी उत्तरात शरद पवारांवर साधला निशाणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडीओ काॅन्फरन्समध्ये उपस्थितांना विरोध पक्षातील एका नेत्यासंबंधी किस्सा सांगितला. मोदी म्हणाले की, "एक दिवस मला एक वरिष्ठ नेते मला भेटले. ते मला कायमच राजकीय विरोधात असतात. पण, मी त्यांचा सन्मान करतो. ते काही मुद्द्यांवर खूश नव्हते. त्यामुळे ते मला भेटायला आले होते. ते म्हणाले की, देशाने तुम्हाला दोन वेळा पंतप्रधान बनविले. पुढे काय करणार आहात? त्यांना असं वाटतं की, दोन वेळा पंतप्रधान झाले, तर सर्व काही प्राप्त झाले. पण, त्यांना माहिती नाही की, मोदी एक वेगळ्याच मातीपासून तयार झाला आहे. त्याला गुजरातच्या मातीने तयार केलेले आहे."

शरद पवार यांच्यावर निशाणा साधला? 

मोदींना हा किस्सा सांगताना कोणत्या नेत्याच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, त्यांनी हे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या भेटीनंतर केलेलं आहे. शिवसेना नेता संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांवर ईडीची कारवाई संदर्भात शरद पवार यांची भेट झालेली होती.

स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय थांबणार नाही

मोदी पुढे म्हणाले की, "मी पंतप्रधान झाल्यानंतर माझं सरकार हे कल्याणकारी योजनांच्या लाभ समाजातील शेवटच्या माणसांना कसा घेता येईल, यासाठी प्रयत्न करत आहे. १०० टक्के हा फक्त आकडा नाही की, तर हे सरकार किती संवेदनशील आणि जनतेची काळजी करणार आहे, हे सिद्ध करते. माझं सरकार ८ वर्षांत देशातील १०० टक्के लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही.

५० टक्के लोकांना शौचालये आणि बॅंक खाते नव्हते

"२०१४ मध्ये जेव्हा एनडीएचं सरकार होतं आणि मी जेव्हा पंतप्रधान झालो तेव्हा देशातील अर्ध्या जनतेकडे बॅंक खात नव्हते की, शौचालये नव्हती. मात्र, आता ८ वर्षांनंतर माझ्या सरकारने काही योजनांमध्ये १०० टक्के लक्ष्य पूर्ण केलेले आहे. गरजूपर्यंत पोहोण्याची आणि त्यांचे हक्क मिळवून देण्याची गरज आहे. मला माहिती आहे की, हे काम खूप अवघड आहे. बरेच नेते हे करू इच्छित नाहीत. पण, मी लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहे, राजकारण करण्यासाठी नाही", असेही त्यांनी सांगितले.

पहा व्हिडीओ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबडवे गावाला राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद

हे वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news