

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : आज (दि.०४) कामिका एकादशी निमित्त हजारो भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली. सद्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर कोरोना निर्बंधामुळे दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे भाविक चंद्रभागेचे स्नान करून, संत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत.
आषाढीला एकादशीला सर्वसामान्य भाविकांना पंढरीत येता आले नाही. त्यामुळे बुधवारी कामिका एकादशीला एकाच दिवसात 50 हजार भाविकांनी उपस्थिती लावल्याचे चित्र दिसून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने मंदिर परिसरात, तसेच प्रदक्षिणा मार्गावर पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांची कोरोना टेस्ट केली जात आहे.
पोलिस विभागाच्या वतीने भाविकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या वेळोवेळी सूचना सुद्धा दिल्या जात आहेत. असे असताना मात्र काल कामिका एकादशीनिमित्ताने पंढरपुरात हजारो भाविकांची गर्दी उसल्ल्याचे चित्र दिसून आले.
काल बुधवारी कामिका एकादशी आहे. वारकरी संप्रदायामध्ये कामिका एकादशीला वेगळे महत्त्व आहे.
आषाढी एकादशीच्या काळामध्ये पंढरपुरा संचारबंदी होती.
अनेक भाविकांना इच्छा असूनही पंढरपूरमध्ये येता आलेलं नव्हते.
बुधवारी कामिका एकादशीनिमित्ताने राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले.
दरम्यान, एकीकडे भाविकांनी गर्दी केली असली, तरी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर कोरोना निर्बंधामुळे बंद आहे.
त्यामुळे भाविक चंद्रभागेचे स्नान करून, संत नामदेव पायरी आणि कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत.
मंदिर परिसरातील प्रसाद विक्रीची दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलली आहेत.
दरम्यान भाजप आमदार प्रशांत परिचारक यांनी येणाऱ्या भाविकांची कोरोना टेस्ट करण्याची मागणी केली होती.
त्याची दखल घेत प्रशासनाच्यावतीने मंदिर परिसरात, तसेच प्रदक्षिणा मार्गावर पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांची कोरोना टेस्ट केली जात आहे.
पोलिस विभागाच्या वतीने भाविकांना कोरोना नियमांचे पालन करण्याच्या वेळोवेळी सूचना सुद्धा दिल्या जात आहेत.
भाविकांनी मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आदीच्या वापराकडे दुर्लक्ष केल्याने वाढती गर्दी कोरोना वाढीस कारणीभूत ठरू नये, याची दक्षता प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
हे ही पाहा :