

पुढारी ऑनलाईन डेस्क : जय दत्तची मुलगी त्रिशला दत्त हल्ली हवाईमध्ये आहे आणि तिची सुट्टी एन्जॉय करत आहे. त्रिशला दत्त सतत हवाई मधून तिचे फोटो शेअर करत असते. या फोटोजमधून पाहिले जाऊ शकते की ती पूर्णपणे कूल आहे.
चाहत्यांना तिचे फोटोज खूप आवडत आहेत आणि कमेंट्सही येत आहेत. तिने तिचा लेटेस्ट कूल फोटो शेअर केला आहे ज्यात ती पाण्यात बसून मजा घेत आहे.
त्रिशाला दत्त सतत हवाई मधून तिचे फोटो शेअर करत असते. या फोटोंमध्ये ती आराम करताना दिसते. त्रिशला संजय दत्त आणि ऋचा शर्मा यांची मुलगी आहे. ऋचा शर्माने आम हम नौजवा, अनुभव, इन्साफ की आवाज आणि सडक छाप सारखे चित्रपट केले. तिने १९८७ मध्ये संजय दत्तशी लग्न केले, पण लग्नानंतर दोन वर्षांनी तिला ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले आणि १९९६ मध्ये तिचा मृत्यू झाला.
त्रिशलाने २०१४ मध्ये तिची पहिली ड्रीम ट्रेसेज हेअर एक्स्टेंशन लाईन सुरू केली. तिने न्यूयॉर्कमधील जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिसमधून कायद्यामध्ये पदवी देखील घेतली आहे. तिचा जन्म १९८८ मध्ये झाला. आईच्या मृत्यूनंतर त्रिशला तिची मावशीसोबत न्यूयॉर्कमध्ये राहते.
हे ही वाचलं का?
https://youtu.be/otbmrjgRYGI