Ujwal Kulkarni : केजीएफ-2 एडिट करणारा १९ वर्षीय उज्ज्वल आहे तरी कोण? | पुढारी

Ujwal Kulkarni : केजीएफ-2 एडिट करणारा १९ वर्षीय उज्ज्वल आहे तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क

सुपरस्टार यश आणि संजय दत्त यांनी मुख्‍य भूमिका साकारलेल्‍या केजीएफ चॅप्टर २  चित्रपटाची सध्‍या बाॅक्‍स ऑफीसवर धूम आहे.चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यशचा हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. केजीएफमध्ये रॉकी भाईची राज आणि अधीराविराेधातील संघर्षाला प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरत आहे.  आता KGF Chapter 2 बद्दल एक मनोरंजक गोष्ट समोर आली आहे. (Ujwal Kulkarni) KGF 2 चित्रपट एडिट करणारी तरुण केवळ १९ वर्षांचा आहे. (Ujwal Kulkarni)

KGF 2 director Prashanth Neel and Ujwal Kulkarni

उज्ज्वल कुलकर्णी

केजीएफ-2 चित्रपटाचे एडिटिंग उज्ज्वल कुलकर्णी या युवकाने केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या चित्रपटाचे एडिटिंग उत्तम करणारा उज्ज्वल कुलकर्णी अवघ्या १९ वर्षांचा आहे. उज्ज्वलचा हा पहिलाच मोठा प्राेजेक्‍ट होता, ज्यामध्ये त्याने काम केले.

याआधी उज्ज्वल कुलकर्णी शॉर्ट फिल्म्स एडिट करायचा. रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक प्रशांत नीलने KGF चॅप्टर 2 पूर्णपणे शूट केला होता. यानंतर उज्ज्वलने त्याचे एडिटींगचे कौशल्य दाखवत त्याचा ट्रेलर बनवला आणि दिग्दर्शक प्रशांत यांना दाखवला.

उज्ज्वलच्या कामाने प्रशांत नील इतका प्रभावित झाला की, त्याने त्याला त्याच्या संपूर्ण चित्रपटाचे एडिट करण्याची संधी दिली. अशा परिस्थितीत उज्ज्वल कुलकर्णीने या संधीचे साेने केले. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर KGF Chapter 2 पाचव्या दिवशी ४२७ कोटींचा आकडा गाठलाय. चित्रपटाची कमाई चांगली होत आहे. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जनही खूप पसंत केले जात आहे. या चित्रपटात यश आणि संजय दत्त यांच्यात स्पर्धा पाहायला मिळाली. याशिवाय रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन सारखे स्टार्स KGF 2 चा भाग आहेत. संजय दत्तचा हा पहिला तेलगू चित्रपट आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ujwal Kulkarni (@editorujwalk)

Back to top button