

मुंबई; पुढारी ऑनलाईन : दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती सोबत मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आगामी 'नवरसा' या तमिळ सीरिजमध्ये झळकणार आहे. याबाबतची माहिती सई ताम्हणकर हिने स्वत: सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सईने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सई ताम्हणकर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती दोघेजण दिसत आहेत. या फोटोसोबत सईने तामिळमध्ये 'नम्मा मक्कल सेल्वन विजय सेतुपती…' अशी कॅप्शन लिहिली आहे.
अधिक वाचा
मणिरत्नम यांच्या या आगामी 'नवरसा'या चित्रपटात मानवाच्या या ९ भावनांवर प्रकाश टाकला जाणार आहे. यात मानवी भावना अर्थात राग, करुणा, धैर्य, द्वेष, भीती, हशा, प्रेम, शांती आणि आश्चर्य याचा समावेश आहे.
अधिक वाचा
नेटफ्लिक्सने ९ जुलै रोजी या सीरिजचा टीझर प्रदर्शित केला होता. या व्हिडीओमध्ये सूर्या, सिद्धार्थ, प्रकाश राज, विजय सेतुपती, रेवती, ऐश्वर्या राजेश यांच्यासारखे अनेक कलाकार दिसले आहेत.
सई ताम्हणकर काही दिवसांपूर्वी 'मीमी' या चित्रपटामुळे चर्चेत होती. आता सई नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'नवरसा' या तमिळ सीरिजमध्ये दिसणार आहे.
अधिक वाचा
तर विजय सेतुपतीला याआधी 'मास्टर' या चित्रपटात पाहिले होते. सईच्या या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचलंत का?