मॅडम सुंदर फोटो टाकता अन् तिकडं ऋतुराज गायकवाड शून्यावर आउट होतो, सायली संजीव ट्रोल | पुढारी

मॅडम सुंदर फोटो टाकता अन् तिकडं ऋतुराज गायकवाड शून्यावर आउट होतो, सायली संजीव ट्रोल

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘इतके सुंदर फोटो टाकतेस, ऋतुराज गायकवाडचं क्रिकेटमध्ये लक्ष लागत नाही’ अशी कमेंट्स नेटकरी अभिनेत्री सायली संजीवच्य़ा (sayali sanjeev) फोटोला देताना दिसत आहे. कारण आहे, सायली संजीवचं (sayali sanjeev) वन पीसमधील फोटोशूट होय. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आणि क्रिकेटर यांचे नाते आपण पाहतो. अनेक क्रिकेटर अभिनेत्रींसोबत लग्नबंधनातदेखील अडकले आहेत. आता मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव आणि ऋतुराज गायकवाड यांचे नाव जोडले जात आहे.

सायली आणि ऋतुराज यांच्याविषयी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगलीय. आता तिने ब्ल्यू कलरच्या वनपीस ड्रेसमध्ये फोटोशूट केला आहे. तिने काही निवडक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात. या फोटोंवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने तिच्या सुंदर फोटोंचं कौतुक करत म्हटलंय की- ‘तुम्ही एवढ्या सुंदर सुंदर फोटो टाकता, त्यामुळे ऋतूराजचे लक्ष सामन्यांमध्ये लागत नाही’.

आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय- ‘ऋतुराज रोज शून्यावर बाद होत आहे. नारळ फोडायला सांगा’, मॅडम त्याला.

गेल्या काही सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाडने एकही रन केली नाही. तो शून्यावर आऊट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठमोळी सायली संजीवने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने काहे दिया परदेस या मालिकेतून गौरीची भूमिका साकारली होती. तसेच तिने परफेक्ट पती या हिंदी मालिकेतही काम केलं आहे. ती सोशल मीडियावर आपले वेगवेगळे फोटो नेहमीच शेअर करत असते.

काही नेटकऱ्यांनी सायलीला ट्रोलदेखील केले आहे. पण, सायलीकडून कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही.
आयपीएलमध्ये ऋतुराज सध्या चेन्नई या संघाकडून खेळत आहे.

हेदेखील वाचले का?

Back to top button