पुढारी ऑनलाईन: अखेर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न करीत आहेत! याच महिन्याच्या 17 तारखेला दोघे चेंबूरमधील राज कपूर यांच्या बंगल्यात लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी रणबीर बॅचलर पार्टीचेही आयोजन करणार आहे. त्यासाठी कुणाला निमंत्रण मिळणार, त्यांची नावेही समोर आली आहेत.
या पार्टीत त्याचे जवळचे तसेच बालपणीचे मित्र सहभागी होतील. या यादीत अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अयान मुखर्जी यांच्या नावाचा समावेश आहे. आलिया आणि रणबीर यांनी डेस्टिनेशन वेडिंग न करता मुंबईतच लग्न करण्याचे ठरवले. रणबीरने स्वतः लग्नाचे ठिकाण निश्चित केले.
चेंबूरमधील 'आरके हाऊस'मध्ये हे लग्न होईल. याच घरात 20 जानेवारी 1980 रोजी रणबीरचे आई-वडील ऋषी आणि नितू कपूर विवाहबंधनात अडकले होते. लग्नात 450 पाहुणे सहभागी होतील.
हेही वाचलंत का?