पुणे : एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने १३ जणांची २ कोटी ५३ लाखांची फसवणूक | पुढारी

पुणे : एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने १३ जणांची २ कोटी ५३ लाखांची फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने तब्बल २ कोटी ५३ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार विमाननगर येथे घडला. या प्रकरणी एजंटांवर पुणे येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

चंद्रशेखर देशमुख, राजेंद्र कुशवाह, पारस शर्मा व त्यांच्या इतर साथीदारावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरकीदपूर, नेवासा फाटा, अहमदनगर येथील एका पालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार विमाननगर येथील प्लॅटिनम बिल्डींग तसेच गंगापूर नाशिक येथे घडला.

फिर्यादीच्या मुलाला नाशिक येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएस ला प्रवेश देतो सांगून आरोपी एजंटांनी त्यांच्याकडून ३० लाख ७२ हजार रुपये घेतले. त्याबरोबरच इतर १२ जणांकडूनही मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली. त्यांना कोणत्याही प्रकारे प्रवेश मिळवून न देता तब्बल १३ जणांची २ कोटी ५३ लाख १७ हजारांची फसवणूक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डोंबाळे करीत आहेत.

Back to top button