दीपिका पदुकोणचे बेडरूम! | पुढारी

दीपिका पदुकोणचे बेडरूम!

पुढारी ऑनलाईन: सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीचे सामान्य चाहत्यांना कुतूहल वाटत असते. अगदी त्यांच्या घराचेही. एके काळी राजेश खन्नाच्या ‘आशीर्वाद’ बंगल्याबाबत जे कुतूहल होते, तसेच सध्या शाहरूखच्या ‘मन्नत’ बंगल्याबाबतही दिसून येते. आता दीपिका पदुकोणच्या आलिशान घराची एक झलक दिसून आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवले होते. यादरम्यान चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीविषयी जाणून घेण्याची संधी मिळते.

दीपिकालाही अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि तिनेही त्यांची दिलखुलास उत्तरं दिली. या सेशनदरम्यानच तिने पहिल्यांदाच तिच्या बेडरूमची झलक शेअर केली. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये बेडवर बसलेल्या दीपिकाने तपकिरी रंगाचे स्वेटर घातलेले दिसते. दीपिकाची बेडरूम अत्यंत साधी, पण आकर्षक आहे. या सेशनमध्ये तिने धम्माल उत्तरे दिली.

यात जर ती एखादा रंग असती तर ती पांढरा रंग असती, जर एखादा मसाला असती तर निश्चितच तिखट असती, एखादे पेय असती तर हॉट चॉकलेट असती अशी उत्तरे तिने दिली आहेत. ‘प्लेस’ म्हणजेच ‘ठिकाण’ असती तर ‘घर’ असे उत्तर देत तिने हा बेडरूमचा फोटो शेअर केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button