तापसीच्या साडीवर लांबलचक कोट!

तापसीच्या साडीवर लांबलचक कोट!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: तापसी पन्नूला कंगनाने किंवा तिच्या (मॅनेजर) बहिणीने कितीही 'सस्ती कॉपी' म्हणून हिणवले तरी तापसीने अनेक चित्रपटांसाठी केलेली मेहनत झाकोळून जाणार नाही. तापसीने अनेक सुंदर चित्रपट केले असून, तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले आहे.

नुकतेच फेमिना ब्युटीफूल इंडियन्स 2022 चे आयोजन करण्यात आले होते व त्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींबरोबर तापसीही सहभागी झाली. यावेळी ग्लॅमरस रूपात झळकत असलेल्या तापसीने आपले काही फोटो आता इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने यावेळी साडीवर एक अतिशय सुंदर व लांबलचक कोट परिधान केला होता. साडी आणि कोट हे कॉम्बिनेशन अनेकांना पसंत पडले आणि आता तिचे हे फोटो चांगलेच व्हायरलही झाले आहेत.

चाहते तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत. तापसीचा नुकताच म्हणजेच 1 एप्रिलला 'मिशन इम्पॉसिबल' हा तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news