Beast release date : विजय थलपथीच्या ‘बीस्ट’च्या नव्या तारखेची घोषणा | पुढारी

Beast release date : विजय थलपथीच्या 'बीस्ट'च्या नव्या तारखेची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार विजय थलपथी त्याच्या आगामी ‘बीस्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ‘बीस्ट’ हा चित्रपट २०२२ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. निर्मात्यांनी नुकतेच विजयच्या ‘बीस्ट’ चित्रपटातील एक पोस्टर शेअर करत नवीन रिलीज डेटची (Beast release date) घोषणा केली आहे. ‘बीस्ट’ हा चित्रपटाला ‘KGF चॅप्टर २’ ला ठक्कर देत असल्याने निर्मात्यानी एक दिवस आधीच चित्रपटाच्या तारखेची घोषणा केली.

विजय थलपथी त्याच्या आगामी ‘बीस्ट’ चित्रपटाचे नुकतेच एक पोस्टर सन पिक्चर्सने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये विजयच्या लूकसोबत चित्रपटाच्या नविन रिलीज डेटची ( Beast release date ) घोषणा करण्यात आली आहे. या धमाकेदार लूकमध्ये विजयच्या हातात एक बंदूक दिसत आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये ‘#BeastFromApril13’ असे लिहिले आहे. तर या चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून U/A प्रमाणपत्र मिळाले असल्याचा खुलासा यावेळी करण्यात आला आहे.

निर्मात्यांनी ‘बीस्ट’ चित्रपटाची याआधी १४ एप्रिल २०२२ रोजी रिलीज डेटची घोषणा केली होती. परंतु, १४ एप्रिल रोजी रॉकिंग स्टार यशचा ‘KGF चॅप्टर 2’ हा चित्रपट सिनेमागृहात दस्तक देत आहे. दोन्ही चित्रपट एकाच वेळी रिलीज होणार असल्याने ‘बीस्ट’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक दिवस आधी म्हणजे, १३ एप्रिल २०२२ रोजी येत असल्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाची नविन तारखेची घोषणा करून निर्मात्यांनी चाहत्यांना खुशखबर दिली आहे. यामुळे विजयच्या आगामी या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

बीस्ट हा एक गँगस्टर थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट नेल्सन दिलीप यांनी दिग्दर्शित केला आहे. विजय थलपाथीसोबत या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे, सेल्वा राघवन, शाइन टॉम चाको, योगी बाबू, गणेश आणि रेडिन किंगस्ले हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील गाण्याला संगीत अनिरुद्ध रविचंद्र यांनी दिले आहे.

या चित्रपटातील ‘अरेबिक कुथू’ आणि ‘जॉली ओ जिमखाना’ ही दोन गाणी रिलीज झाली आहेत. यातील खास म्हणजे, विजय थलपथीने ‘जॉली ओ जिमखाना’ या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणे चाहत्याच्या पसंतीस उतरले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Thalapathy vijay (@thalapathy__vijay)

Back to top button