इंदापूर : शेळगाव येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

इंदापूर : शेळगाव येथील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

शेळगाव : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर-बारामती मार्गावर इंदापूरहून बारामतीकडे निघालेल्या दुचाकीस्वार व बारामतीहून इंदापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या अज्ञात वाहनांमध्‍ये अपघात झाला. ही दुर्घटना शेळगाव (ता. इंदापूर) हद्दीतील तांबोळी पाटी येथे बुधवारी (दि. २३) रात्री घडली. या अपघातात आनंदराव सोपानराव निंबाळकर (वय ५४, रा. परीट्वाडी, लासुर्णे) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदराव निंबाळकर हे त्यांच्या मोटारसायकलने इंदापूरहून बारामतीकडे जात होते. यावेळी बारामतीहून इंदापूरकडे समोरुन येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये आनंदराव निंबाळकर गंभीर जखमी झाले.

उपचारासाठी जमलेल्या नागरिकांच्या मदतीने लासुर्णे येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्‍यांच्‍या मृत्‍यू झाल्‍याचे  डॉक्टरांनी घोषित केले. या अपघाताची फिर्याद आनंदराव यांचा पुतण्या प्रशांत गणपत निंबाळकर यांनी वालचंदनगर पोलिसात दिली आहे.

घटना समजताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक महावीर कांबळे, उपनिरीक्षक धर्मापाल सांगळे,  हवालदार वसंत कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली. तपास हवालदार प्रकाश माने करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button