मुंबई; पुढारी ऑनलाईन : आदिराज याला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का? छोट्या पडद्यावरील अजूनही बरसात आहे या मालिकेची उत्कंठा वाढली आहे. आदिराज आणि मीरा यांची भेट होईल की नाही. अशी परिस्थिती असताना १० वर्षांनी तो आणि मीरा पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत.
अधिक वाचा –
प्रेमाला कुठे असते Expiry Date? असं म्हणत बऱ्याच वर्षांनी उमेश कामत आणि मुक्ता बर्वे हे कलाकार सोनी मराठी वाहिनीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले.
अधिक वाचा –
मालिकेवर आणि या जोडीवर चाहत्यांच्या प्रेमाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. चाहत्यांनी कविता पाठवून, रांगोळ्या काढल्या.
मालिकेच्या शीर्षकगीताची कॅलिग्राफी केलेली छत्री तयार करून आपलं प्रेम कलाकारांपर्यंत पोचवलं आहे. एवढंच नाही तर #Adira असा हॅशटॅगसुद्धा या जोडीसाठी चाहत्यांनी बनवला आहे.
अधिक वाचा –
आता पुढे त्यांच्या आयुष्यात काय घडणार, हे पाहणं खूप उत्सुकतेचं असणार आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम वर्तमानावर होईल का? हे सगळं पुढे उलगडत जाणार आहे.
मीरा आणि तो अजूनही अविवाहित आहेत. मीराच्या आयुष्यात तिचा एक मित्रही आहे. आता आदिला विसरून मीरा आयुष्याची सुरुवात नव्याने करेल का? आदि आणि मीरा यांचं नातं कोणतं वळण घेईल? जाणून घेण्यासाठी पाहत राहा, 'अजूनही बरसात आहे', सोम.-शनि., रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.
हे देखील वाचलतं का –
पाहा व्हिडिओ – अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने जाणून घेऊया मुंबईतल्या मूर्तिकारांची व्यथा