मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कुंद्रा समोर येताच शिल्पाला अश्रू अनावर झाले. तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाची बदनामी झाली, असा संताप शिल्पाने व्यक्त केला. कुंद्रा, अनेक प्रोजेक्ट माझ्या हातून निघून गेले. माझ्याशी खोटेपणाने का वागलास, मला तुझ्या उद्योगाबद्दल का नाही सांगितलंस, आपल्याला पैशांची कमी होती का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत अभिनेत्री शिल्पा शेट्टी धाय मोकलून रडली.
अधिक वाचा –
23 जुलैच्या सायंकाळी शिल्पा शेट्टीला पोलिसांनी राजसमोर नेले. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. ती अक्षरशः जमिनीवर कोसळली.
तिला समजावण्याचा प्रयत्न राज करत होता. मी पॉर्न नव्हे इरॉटिक चित्रपट बनवले आहेत, असे तो म्हणत होता. पण शिल्पा ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
अधिक वाचा –
शिल्पाने आपल्या वकिलाला सोबत ठेवून पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामध्ये तिने वैयक्तिक आयुष्यासह बँक खात्यांवर सुद्धा माहिती दिली. राजच्या उद्योगांविषयी आपल्याला माहिती नाही. मी केवळ त्याच्या व्यवसायात भागीदार होते.
मला या उद्योगात लक्ष घालायला वेळ नसायचा. मी चित्रपट आणि कार्यक्रमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असायची, असे शिल्पाने सांगितले.
अधिक वाचा –
व्यवसायाचे सगळे काम राज करायचा, असे शिल्पाने पोलिसांना सांगितले. यावेळी राजने पुन्हा शिल्पाशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र ती खूप रागात होती. मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू असे काही करशील असे मला वाटले नव्हते. त्यावर मी पॉर्न चित्रपट बनवले नाहीत, माझ्यावर खोटा आरोप होतोय, असे पालुपद राजने लावले. त्यानंतर ती काहीशी शांत झाली.
शिल्पा शेट्टी, राजला सेबीचा दणका
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राज आणि शिल्पा शेट्टीला आणखी एक दणका बसला आहे. सेबीने शिल्पा शेट्टीला 3 लाखांचा दंड ठोठावला आहे.
ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.
राज, शिल्पा शेट्टी, रिपू कुंद्रा आणि त्यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवर सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
20 जुलैला राजला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
याप्रकरणी राज आणि शिल्पा शेट्टीच्या बँका खात्यांची देखील मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली आहे. राजच्या बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचे उघड झाले आहे. तर राजची कानपूरमधील दोन बँक खाती सील केली आहेत.
हे देखील वाचलतं का –
पाहा व्हिडिओ – साडेचार वर्षाच्या आयुषने मुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा