Chakda Xpress : अनुष्का नव्या चित्रपटासाठी घेतेयं कडी मेहनत (video) | पुढारी

Chakda Xpress : अनुष्का नव्या चित्रपटासाठी घेतेयं कडी मेहनत (video)

पुढारी ऑनलाईन: बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ (Chakda Xpress) चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या अनुष्का या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेताना दिसली आहे.

अनुष्का लग्नानंतर खूप कमी चित्रपटांमध्ये दिसली. परंतु, सध्या ती बॉलिवूडमध्ये पुनरागन करत आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ (Chakda Xpress) घेवून येत आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी याच्या आयुष्यावर आधारीत आहे. यात अनुष्का झुलन गोस्वामीची मुख्य भूमिका साकारणार आहे. याच दरम्यान अनुष्का चित्रपटासाठी क्रिकेटचा जोरदार सराव करताना दिसली आहे.

नुकतेच अनुष्काने आपल्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने ब्लॅक रंगाच्या शर्ट, हॅट आणि डेनिममध्ये परिधान केल्याचे दिसत आहे. यामध्ये ती व्यायामापासून बॉलिंग अॅक्शन आणि बॅटिंगपर्यंतचा सराव करत आहे. यातील खास म्हणजे, अनुष्काने क्रिकेटमधील बॉलिंग अॅक्शन शिकण्यावर जास्त भर दिला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘गेट-स्वेट-गो! #ChakdaXpress ची तयारी दिवसेंदिवस कठीण होत आहे आणि प्रत्येक दिवशी मेहनत घ्यावी लागत आहे.’ असे लिहिले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी अनेक भरभरून कौतुक केले आहे. यात एका युजर्सने क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी पहिल्यांदाच क्रिकेटरची भूमिका साकारणार असल्याने उत्साहित असल्याचे म्हटले आहे. यावरून चाहते अनुष्काच्या आगामी आगामी ‘चकडा एक्सप्रेस’ (Chakda Xpress) चित्रपटाती आतुरतेने वाट पाहत आहेत.

अनुष्का शेवटची बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अनुष्का आणि शाहरूखसोबत कॅटरिना कैफने मुख्य भूमिका साकारली होती. ‘झिरो’ चित्रटानंतर अनुष्का कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तर मध्यंतरी ती वैवाहिक आयुष्यात बिझी होती. याशिवाय अनुष्काने ‘पाताल लोक’ वेबसिरीज आणि ‘बुलबुल’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button