Skoda Slavia : स्कोडाची नवी कार स्लाव्हिया पाहिली का? हे आहेत फिचर्स

SKODA SLAVIA
SKODA SLAVIA
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  स्कोडा कंपनीने स्लाव्हिया (Skoda Slavia) हे नवे कार मॅाडेल लॅान्च केले आहे. प्रीमियम कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंट असणाऱ्या या स्लाव्हियाने कार खरेदीदारांना आकर्षित केले आहे. ही नवीन स्कोडा स्लाव्हिया फेब्रुवारी 2022 मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली आहे.

कंपनीची स्लाव्हिया ही नवी कार एक दशक पूर्ण केलेल्या जुन्या स्कोडा रॅपिड या कारची जागा घेणार आहे. तसेच कंपनीकडून याआधीच्या कारच्या तुलनेत पॅरामीटर्समध्ये सुधारणा करत ग्राहकांना अधिक चांगली कार देत असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यापैकी एक पॅरामीटर्स म्हणजे सुरक्षा वैशिष्ट्ये (safety features) हे आहे, ज्याला स्कोडाने जास्त महत्त्व देत ग्राहकांना एक चांगले फिचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे.

स्कोडा स्लाव्हियाची सुरेक्षेविषयक असणारी फिचर्स

चांगले सुरक्षाविषयक फिचर्स देत सुसज्ज असणारी स्कोडाची कंपनीची ही नवी स्लाव्हिया कार चांगलीच चर्चेत आहे. रिमोट किलेस एंट्री , रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि अँटी थेप्ट अलार्म (चोरी विरोधी अलार्म) अशा सध्याच्या इतर अधुनिक मॅाडर्न कारच्या फिचर्स यामध्येही असणार आहेतच. पुश स्टार्ट-स्टॉप बटण हा वैशिष्ट्यपूर्ण असा एक नवा बदल कारच्या दरवाजाच्या हँडलवर असणाऱ्या बटणामध्ये दिसून येईल.

नवीन स्कोडा स्लाव्हियामध्ये एकूण सहा एअरबॅग्ज आहेत, जो इतर सर्व प्रतिस्पर्धक असणाऱ्या कंपन्यांच्या कारमध्ये असणारा महत्त्वाचा घटक यामध्ये देखील पहायला मिळेल. हे स्लाव्हियाच्या एअरबॅग्जच्या या संपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण श्रेणीत ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आहेत, तर साईड आणि कर्टन (पडदा) एअरबॅग्स या टॉप-स्पेक स्टाइल प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

मात्र, या फिचर्समध्ये ड्रायव्हर-नी एअरबॅगची (driver-knee airbag) कमतरता आहे, जे अपघाताच्या वेळी ताबडतोब फुगते आणि आसनाच्या खालच्या भागावर असणाऱ्या गुडघ्याला दाबते ज्यामुळे चालक सुरक्षितपणे जागेवर राहतो.

नवीन स्कोडा स्लाव्हियामध्ये रिअरव्ह्यू मिररच्या आत एक ऑटो-डिमिंगदेखील आहे, जे पूर्वी उपलब्ध असलेल्या रॅपिडकडे नव्हते. ज्यांना सेल्फ-डिमिंग मिररदेखील म्हणतात, सभोवतालच्या आणि घटना प्रकाशाच्या पातळीनुसार स्वयंचलितपणे मंद आणि स्पष्ट होऊ शकतात. स्लाव्हियाला मागील आसनांसाठी ISOFIX माउंट्स देखील मिळतात, जे लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक चांगले वैशिष्ट्य आहे.

स्कोडा स्लाव्हियाच्या ड्रायव्हिंग डायनॅमिक्समध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने असलेल्या इतर सुरक्षा वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ब्रेक डिस्क वाइपिंग, मोटर स्लिप रेग्युलेशन, मल्टी-कॉलिजन ब्रेकिंग, EBD सह ABS आणि ट्रॅक्शन यांचा समावेश आहे. आणखी एक इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉकिंग सिस्टमदेखील यामध्ये पहायला मिळेल.

स्लाव्हिया दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध

फक्त पेट्रोल-सेडान म्हणून सादर केलेली, नवीन स्लाव्हिया दोन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध केली आहे. जे 1.0-लिटर तीन-सिलेंडर TSI पेट्रोल 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क निर्माण करते, तर 1.5-लीटर चार-सिलेंडर TSI पेट्रोल इंजिन 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्कचा असल्याचे कंपनीकडून सांगितले जाते. दोन्ही इंजिनांसाठी 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स व्यतिरिक्त, पर्यायी स्वयंचलित ट्रान्समिशनसहदेखील यामध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news