बीड : अवैध वाळूच्या डंपरवर कारवाई; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

बीड : अवैध वाळूच्या डंपरवर कारवाई; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गेवराई; पुढारी वृत्तसेवा: अवैध वाळू उपसा करून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला मिळाली. याच्या आधारे त्यांनी एका डंपरसह साडेपाच ब्रास वाळू ,असा एकूण २५ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला मिळाली होती. अंगरनादूर फाटा येथे डिसेंन्ट हॉटेलजवळ या पथकाने शनिवारी (दि.१२) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास वाळूने भरून चाललेल्या डंपरवर कारवाई केली.

यावेळी त्यांना पोलिसांनी रॉयल्टीबाबत विचारणा केली. संबंधितांकडे रॉयल्टीची पावती नसल्याचे निदर्शनास आले. पुढील कारवाईसाठी डंपर गेवराई पोलिस ठाण्यात नेण्यात आला. एक डंपर आणि साडेपाच ब्रास वाळू, असा एकूण २५ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी दराडे, राजू वंजारे, सचिन हंकारे, सचिन पटेकर यांनी केली. या प्रकरणाचा गेवराई पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

अवैध वाळू वाहतूक बंद करावी

रेतीची वाहतूक करणारे वाहने नेहमी या भागात असतात. अनेकांना या वाळूमुळे जीव गमवावा लागला आहे. तरी अवैध वाळू वाहतूक सुरूच असते. याबाबत प्रशासनाने योग्य दखल घेऊन अवैध वाळू वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button