कच्चा बादाम फेम भुबन वाड्याकरला रुग्णालयातून डिस्चार्ज

kacha badam singer bhuban badyakar accident
kacha badam singer bhuban badyakar accident
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कच्चा बादाम हे लोकप्रिय गाणे गाणारे गायक भुबन वाड्याकर याचा अपघात झाला होता. कार चालवायला शिकत असताना त्याचा अपघात झाला. अपघातानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. किरकोळ दुखापतीनंतर त्याच्यावर उपचार करून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले.

हा अपघात पश्चिम बंगाल येथील बीरभूम येथे झाला. या अपघातात भुबन हा जखमी झाला आहे. भुबन वाड्याकर याला छातीला दुखापत झाली होती.

कार चालवणे शिकत होता भुबन

भुबनने नुकताच एक कार खरेदी केलीय. ही कार शिकण्यासाठी तो प्रयत्न करत होता. पण, यावेळी त्याचा अपघात झाला.

खूप व्हायरल झाले गाणे

भुबन पश्चिम बंगालमध्ये शेंगदाणे विकण्याचे काम करत होता. शेंगदाणे विकत असताना ते कच्चा बादाम गाणे गायचा. हे गाणे सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले. त्यानंतर भुबन प्रसिध्दीच्या झोतात आला.

म्युझिक कंपन्यांकडून ऑफर

भुबनने नुकताच एका म्युझिक कंपनीसाठी कच्चा बादाम गाण्याचं व्हिडिओ शूटदेखील केला. त्याला अनेक कंपन्या आणि टीव्ही शोतून ऑफर मिळत आहेत. त्यामुळे भुबनचं संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं आहे. भुबनच्या कच्चा बादाम गाण्यावर लाखों नेटकऱ्यांनी रील्स तयार केले.

तो एका हिंदी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला- कच्चा बादाम या आपल्या व्हायरल गाण्याबद्दल आणि लोकांना ते आवडेल याची कल्पना नव्हती. माझ्या गाण्याबद्दल लोकांना माहिती व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या कुटुंबासाठी कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सरकारने मला काही निधी द्यावा, अशी माझी इच्छा आहे. मला त्यांना खायला चांगले अन्न आणि घालायला चांगले कपडे द्यायचे आहेत.

अभिनेता नील भट्टाचार्यनेदेखील या गाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता नील भट्टाचार्यने अपलोड केलेल्या इन्स्टाग्राम रीलमध्ये भुबन त्याच्याच गाण्यावर नाचताना दिसला. व्हिडिओ शेअर करताना नीलने लिहिले की, त्या माणसासोबत ज्याने हे गाणे गायले आहे. या रत्नाला सपोर्ट करा… त्याला भेटून आनंद झाला," क्लिपमध्ये, भुबन एका गटासह गाण्यावर नाचताना दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news