HBD Justin Bieber : फॅनवर थुंकल्याचा जस्टीनवर झाला होता आरोप

HBD justine biber
HBD justine biber
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

हॉलिवूडचा प्रसिध्द गायक जस्टिन बीबरचा (Justin Bieber) आज (१ मार्च) वाढदिवस आहे. परदेशातचं नाही तर भारतामध्येही जस्टीन खूप प्रसिध्द आहे. त्याने खूप कमी वयात इतकी लोकप्रियता मिळवली की, जगभरात त्याचे फॅन्स आहेत. बीबरच्या वाढदिवसादिवशी ट्विटरवर हॅप्पी बर्थडे जस्टीन बीबर ट्रेंड करत आहे. जगभरातील लोक त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. (Justin Bieber)

Justin Bieber
Justin Bieber

जस्टिन वयाच्या १२ व्य वर्षांपासून गात आहे. इतकचं नाही तर जस्टीन यूट्यूबवर सर्वात अधिक सबस्क्रायबर्स करणारा मेल सिंगर आहे. जस्टिन आज सुपरस्टार होण्यात त्याची आई पॅटी मॅलेटीचं मोठं योगदान आहे. जस्टिनला गाण्यांची खूप आवड होती आणि तो नेहमी गाणी म्हणत राहायचा. एक दिवस त्याच्या आईने त्याचे गाणे लपून रेकॉर्ड केलं.

Justin Bieber
Justin Bieber

जस्टीनचा पहिला यूट्यूब व्हिडिओ त्याच्या आईने असंचं यूट्यूबवर अपलोड केला होता. पण, पाहता पाहता हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि जस्टिन प्रसिध्द झाला. जस्टीनला यूट्यूबवर गाणे गाताना ऐकल्यानंतर बिझनेसमॅन स्कूटर ब्रॉनने त्याला संगीताच्या दुनियेत एक धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी सज्ज केलं. यानंतर जस्टिनला मागे वळून पाहावं लागलं नाही. त्याच्याविषयी सांगायचं झालं तर तो अनेक वर्षे डिप्रेशनचा बळीदेखील ठरला होता.

जस्टीनला टॅटूची आवड आहे. कमी वयात जस्टिन एक आंतरराष्ट्रीय गायक आहे. कोटींची संपत्ती असणारा जस्टीन वादग्रस्तही ठरला होता. २०१३ मध्ये जस्टीनवर आपल्या हॉटेलच्या बाल्कनीखाली प्रशंसकांवर थुंकल्याचा आरोप झाला होता. पण, त्याने ही गोष्ट नाकारली होती.

कोटींच्या संपत्तीचा मालक

रिपोर्ट्सनुसार, तो जवळपास २०५० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. (२०२१) आज एका लाईव्ह कॉन्सर्टसाठी तो १०० ते १५० कोटी रुपये घेतो. त्याच्या एकूण संपत्तीमध्ये कोटींचे बंगले, गाड्या, इन्व्हेस्टमेंट आणि प्रोडक्शन हाऊसचा समावेश आहे. जस्टीनच्या गाड्यांचे कलेक्शनची गोष्ट केल्यास जस्टीनकडे ऑडी, फेरारी, लंबोर्गिनी यासारख्या ८० कोटींच्या गाड्या आहेत. याशिवाय, बेवर्लीमध्ये जस्टीनच्या बंगल्याची किंमत ६० कोटी रुपये आहे. जस्टीनच्या या बंगल्यात जवळपसा ५ बेडरूम आणि ७ बाथरूम आहेत.

Justin Bieber
Justin Bieber

जस्टीन अल्बम्स, लाईव्ह कन्सर्टच्या माध्यमातून पैसे कमावतो. जस्टीन आज कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. प्रत्येक वर्षी २-३ लाईव्ह कन्सर्ट करून कोटींचे संपत्ती कमावतो. इतकचं नाही तर २०१४ मध्ये जस्टिन जवळपास ८० मिलियन डॉलरची कमाई करून ३० वर्षांपेक्षा कमी वयाचा सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी ठरला होता.

Justin Bieber
Justin Bieber

२०१० मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी जस्टीनचा पहिला अल्बम 'माय वर्ल्ड २.०' रिलीज झाला होता. या अल्बममधील 'बेबी' हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. या गाण्याने जस्टीनला रातोंरात स्टार बनवले होते. त्याने आतापर्यंत करिअरमध्ये 'बेबी', 'लेट मी लव्ह यू', 'आय ॲम द वन' आणि 'व्हॉट डू यू मीन' यासारखे अनेक हिट गाणी गायली आहेत.

Justin Bieber
Justin Bieber

 

View this post on Instagram

 

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news