Neha Kakkar : नेहा कक्करच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ | पुढारी

Neha Kakkar : नेहा कक्करच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या (Neha Kakkar) आवाजाने अनेकांना मोहिनी घातली आहे. आता तिच्या एका नव्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘नाराजकी’ हे नवीन गाणं यूट्यूबवर नुकतंच रिलिज झालं आहे. या गाण्याला अवघ्या दोन तासांत २५ लाखांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाखांहून अधिक लोकांनी या गाण्याला लाईक करून पसंती दर्शवली आहे.

सोलापूर : ‘मंत्री नवाब मलिकांना देशभक्त दाखविण्याचा प्रयत्न’

नेहा कक्करने स्वत: कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करून ‘मला नेहमीचं अशा प्रकारचं गाणं गायचं होतं आणि तसं गाणं मी गायलं आहे. मला आशा आहे, की तुम्हालाही हे गाणं आवडलं असेल, असे म्हटले आहे.

नाशिक : महिला उमेदवारांना पूरक ठरणारा प्रभाग 18

तर खैरियत भी पुछते नहीं, ना बात करते हों, असा उल्लेख करत आपलं नाराजगी हे नवं गाणं रिलीज झाल्याचे नेहाने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे. तसेच तिने या गाण्याची एक झलकही पोस्ट केली आहे. नेहाच्या या गाण्याला एक हजाराहून लोकांनी कमेंट करून आपली मते व्यक्त केली आहेत.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ

अभिनेत्री सई ताम्हणकर कशी शिकली फ्रेंच भाषा?

Back to top button