Bhola Shankar : महाशिवरात्रीला चिरंजीवीची हटके स्टाईल, फर्स्ट लूक रिलीज | पुढारी

Bhola Shankar : महाशिवरात्रीला चिरंजीवीची हटके स्टाईल, फर्स्ट लूक रिलीज

पुढारी ऑनलाईन : दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांचा आगामी ‘भोला शंकर’ ( Bhola Shankar ) चित्रपट पडद्यावर येण्याआधीच चर्चेत आला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सध्या ‘भोला शंकर’ चित्रपटातील चिरंजीवीचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

चिरंजीवी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर ‘भोला शंकर’ ( Bhola Shankar ) चित्रपटातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत चिरंजीवी त्रिशूल असलेल्या लॉकेटची चेन बोटात फिरवताना दिसत आहेत. एवढेच नाही तर ते जीपच्या बोनेटवर बसून गॉगल घालून पोझ देताना दिसत आहे.

यावेळी चिरंजीवी ब्लॅक रंगाच्या शर्ट आणि पॅन्टमध्ये हटके दिसत आहे. या फोटोतील खास म्हणजे, चिरंजीवीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘भोला शंकर’ चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ‘भोला’ नावाचे एक गाणे देखील वाजत आहे.

या व्हिडिओला कॅप्शन देताना चिरंजीवीने लिहिले आहे की, ‘सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा, भोला शंकरचा फर्स्ट लूक, # VibeOfBHOLAA #BholaaShankarFirstLook.’ हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या चित्रपटात अॅक्शन ड्रामासह चिरंजीवीची हटके स्टाइल पाहायला मिळत आहे. चित्रपटात चिरंजीवीने ‘शंकर’ ची मुख्य भूमिका साकारली आहे. चिरंजीवीसोबत या चित्रपटात बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री कीर्ती सुरेश चिरंजीवीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

सत्यानंद यांनी ‘भोला शंकर’ चित्रपटाची कथा लिहिली असून तिरुपती ममिदला यांनी संवाद लिहिले आहेत. यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button