राशि खन्ना : कोण आहे अजय देवगनची 'ही' बोल्ड अभिनेत्री? | पुढारी

राशि खन्ना : कोण आहे अजय देवगनची 'ही' बोल्ड अभिनेत्री?

पुढारी ऑनलाईन

दाक्षिणात्य अभिनेत्री राशि खन्ना सध्या चर्चेत आहे. ती बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत रूद्र चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्या झोळीत सध्या अनेक चित्रपट येऊन पडले आहेत. तिने साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यसोबत मॉस्कोमध्ये ‘थँक यू’चे शूटिंग पूर्ण केले आहे. आता ती आपल्या आगामी चित्रपट ‘योद्धा’च्या शूटिंगमध्ये बिझी झालीय. डिज्नी प्लस हॉटस्टार आगामी वेब सीरीज ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’मध्ये अभिनेता अजय देवगन आणि साऊथ स्टार राशि खन्ना मुख्य भूमिकेत असेल. याशिवाय ईशा देओल, अतुल कुलकर्णी, अश्विनी काळसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी आणि सत्यदीप मिश्रा यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. रुद्र: द एज ऑफ डार्कनेस ४ मार्च, २०२२ मध्ये रिलीज होईल. हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि बंगालीमध्ये रिलीज होईल.

एका रिपोर्टनुसार, चित्रपटाची टीम आधीपासून मुंबईत शूटिंग करत आहे. आता ही टीम दिल्लीसाठी रवाना होईल. या चित्रपटामध्ये राशिसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा रॉच्या एजेंट म्हणून काम करत आहे.

कोण आहे राशि खन्ना?

अभिनेत्री राशि खूप सुंदर आणि बोल्ड आहे. तिची साऊथ इंडस्ट्रीत लोकप्रियता अधिक आहे. राशी भारतीय चित्रपटातीस सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमी आपल्या बोल्ड फोटोजमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते.

तेलुगू चित्रपटांतून मिळाली ओळख

तुम्हाला माहितीये का, राशि चित्रपटात येणं एक योगायोग होतं. ती तेलुगू चित्रपटांसाटी ओळखली जाते.

बॉलीवूड अभिनेत्रींनाही देते मात

राशिने बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे. तिचे फोटो तिने स्वत: सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
तिने २०१४ मध्ये चित्रपट ‘जोरू’मधून साऊथ चित्रपटात पाऊल ठेवलं होतं.

मद्रास कॅफेतून मिळाला ब्रेक

आज राशि साऊथची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २०१३ मध्ये ‘मद्रास कॅफे’तून अभिनय करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती जॉन अब्राहमची पत्नीची भूमिकामध्ये होती. राशिला कॉपीरायटर व्हायचं होतं. फेमिना मॅगजीनसाठी राशि कव्हर गर्लदेखील झाली होती. इतकचं नाही तर राशिला गाणी गायला देखील आवडतं. तिने इंडियल आयडलचं ऑडिशनदेखील दिलं आहे. पदवीनंतर राशिने मॉडल करिअरची सुरुवात केली. राशिने अनेकई रँपवॉक, प्रिंटशूट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)

 

View this post on Instagram

 

A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)

 

View this post on Instagram

 

A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)

 

View this post on Instagram

 

A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)

Back to top button