मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज कुंद्रा पोर्न रॅकेट : शिल्पा शेट्टी हिची राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिली पोस्ट व्हायरल झाली आहे. शिल्पा शेट्टी हिने तिचा पती राज कुंद्राला अटक झाल्यानंतर पहिली इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे.
राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी १९ जुलैला पोर्नोग्राफी केस प्रकरणी अटक केली होती. पण, त्यानंतर शिल्पा मीडियासमोर आली नाही. किंवा तिने कुठलीही गोष्ट सार्वजनिक केलेली नाही.
ती सोशल मीडियापासून दूर होती. गुरुवारी रात्री तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पुस्तकाचा फोटो पोस्ट केला आहे.
अधिक वाचा-
राज कुंद्रा पोर्न रॅकेट
त्या पोस्टमध्ये जेम्स थर्बरचे विचार अधोरेखित केले आहेत. त्यात लिहिलंय – "रागाने मागे वळून पाहू नका किंवा भीतीने पाहू नका तर जागरूकतेने पाहा."
शिल्पाने पोस्टमध्ये म्हटलंय –
पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, "आपण रागाने मागे वळून पाहतो. ज्यांनी आपले मन दुखावले आहे. जे नैराश्य आपण सहन केलेलं असतं.
अधिक वाचा-
जे दु:ख आपण सहन केलेलं असतं. आपल्याला असं वाटू लागतं की, आपण आपली नोकरी गमावू शकतो. आपल्या एखादा आजार होऊ शकतो. किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूच्या शक्यतेची आपल्याला भीती वाटते.
अधिक वाचा-
आपल्याला ज्या ठिकाणी असण्याची गरज आहे ते इथे आहे. मी एक मोठा श्वास घेतो. कारण जिवंत राहण्यासाठी मी भाग्यवान आहे.
मी भूतकाळात आव्हानांचा सामना केला आहे. आणि भविष्यात आव्हांनांपासून वाचेन. आज मला माझे जीवन जगताना विचलित होण्याची गरज नाही."
अधिक वाचा-
या रहस्यमय पोस्टच्या माध्यमातून शिल्पाने आपल्या वर्तमान काळातील परिस्थिती शेअर केली आहे.
पण, पोस्टमध्ये तिने राज कुंद्राविषयी काहीही सांगितलेले नाही. ती निश्चितपणे जीवनात आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार आहे.
दरम्यान, राज कुंद्रा पोर्नोग्राफी केसच्या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
अधिक वाचा-