पावसाचा जोर राहिल्यास कागल मार्गावर पाणी येण्याची शक्यता | पुढारी

पावसाचा जोर राहिल्यास कागल मार्गावर पाणी येण्याची शक्यता

कागल ; पुढारी वृत्तसेवा : पुणे बंगळूर या मार्गावर कागल येथे दुधगंगा नदीची पाणी पातळी वाढत आहे. दरम्यान पावसाचा जोर असाच राहिला तर कागल महामार्गाजवळ दुपारपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे.

वेदगंगा नदीचे पाणी यमगर्णी पुलावर आल्याने महामार्गावरील सर्व वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे.

तसेच कागल ते निढोरी राज्यमार्गावर देखील सिद्धनेर्ली नदी किनारा येथे दुधगंगा नदीच्या पुलावर पाणी आल्याने हा मार्ग देखील बंद झाला आहे.

अधिक वाचा :

यामुळे या मार्गावरील पुर्णपणे वाहतूक व्यवस्था खंडित झाली आहे.

महामार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पूर परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे.

नदी काठावरील गावामध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात येत आहे.

कर्नाटकात जाणारी आणि येणारी सर्व वाहने रोखण्यात आल्याने दूधगंगा नदीवरील पुलावर अवजड वाहने उभी करण्यात आलेली आहे.

ही अवजड वाहने पुलावरून दूर करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.

पावसाचा जोर असाच राहिला तर कागल येथील कोरोना सेंटरमध्ये देखील पाणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

दरम्यान सकाळी नामदार हसन मुश्रीफ यांनी तात्काळ कोरोना सेंटरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे उपस्थित होते.

हे ही वाचा

Back to top button