राज कुंद्रा याने न्यूड ऑडिशनची केली होती मागणी; सागरिका शोना सुमनचा मोठा आरोप
राज कुंद्रा याने न्यूड ऑडिशनची केली होती मागणी; सागरिका शोना सुमनचा मोठा आरोप

न्यूड ऑडिशन देण्‍यासाठी माझ्‍यावर आणला दबाव; मॉडेलचा राज कुंद्रावर आरोप

Published on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मी न्यूड ऑडिशन द्‍यावी यासाठी राज कुंद्राने  माझ्‍यावर दबाव आणला हाेता, असा धक्‍कादायक आराेप अभिनेत्री मॉडेल सागरिका शोना सुमन हिने केला आहे. न्यूड ऑडिशन दिल्‍यास वेबसीरिजमध्‍ये काम मिळेल, असे आमीषही मला दाखविण्‍यात आले हाेते, असेही तिने म्‍हटले आहे.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि राज कुंद्राला याला अटक झाली आहे.  पार्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी त्‍याला अटक झाली आहे.

अधिक वाचा – 

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री, मॉडल सागरिका शोना सुमनने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अधिक वाचा – 

ती म्हणाली की,  त्याने 'न्यूड ऑडिशन' देण्याची मागणी केली होती.

सागरिकाने त्याच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. कुंद्राद्वारा निर्मित एका वेब सीरीजमध्ये तिला एक रोल ऑफर केला होता.

व्हिडिओमध्ये सागरिका शोना सुमनने दावा केला.  ती म्हणाली, 'मी एक मॉडल आहे आणि मी चार वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मी खूप काम केलेले नाही.

लॉकडाऊन दरम्यान काही गोष्टी घडल्या त्या मला शेअर करायच्या आहेत.

न्यूड ऑडिशनची राज कुंद्राने केली होती मागणी : सागरिका शोना सुमन
न्यूड ऑडिशनची राज कुंद्राने केली होती मागणी : सागरिका शोना सुमन

न्यूड ऑडिशन देण्याची केली मागणी 

ऑगस्ट २०२० मध्ये मला कुंद्राचा सहकारी उमेश कामत याचा फोन आला. त्यांनी मला एक वेब सीरीज ऑफर केली.

मी त्याला विचारलं राज कुंद्रा काेण आहेत, त्याने सांगितलं की,तो शिल्पा शेट्टीचा पती आहे.

जेव्हा मी व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी झाले तेव्हा त्यांनी मला न्यूड ऑडिशन देण्याची मागणी केली.

मला धक्का बसला. मी न्यूड ऑडिशनसाठी नकार दिला. व्हिडिओ कॉलमध्ये तीन लोक होते. त्यातील एकाने आपला चेहरा झाकला होता, असेही सागरिका शोना सुमन सांगितले.

अधिक वाचा – 

मला वाटतं की, जर तो अशा गोष्टींमध्ये सहभागी असेल तर त्याला अटक व्हाव. आणि रॅकेटचा पर्दाफाश केला जावा, अशी मागणीही तिने केली आहे.

पार्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने कुंद्राला अटक केले आहे. त्यांच्यावर अश्लील चित्रपट बनवणे आणि काही ॲपच्या माध्मातून ते व्हायरल करण्याच्या आरोप आहे.

अधिक वाचा –

पाहा व्हिडिओ – कळसूबाई डोंगररांगेतील निसर्गरम्य त्रिंगलवाडी किल्ल्याची सैर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news