अभिनयातील देव गेला | पुढारी

अभिनयातील देव गेला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

‘ब्लॅक अँड व्हाईट’पासून ते फुुजी, इस्टमन कलरपर्यंत चित्रपटांच्या एका युगाचे साक्षीदार असलेले आणि मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये नायक ते खलनायक, चरित्रनायक अशा विविधरंगी भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी (दि. 2) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले ‘देव’ हे नाव आपल्या अजातशत्रू वृत्तीतून आणि शालीन स्वभावातून रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीसारख्या ‘ग्लॅमरस’ दुनियेतही सार्थ ठरविले!

मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते 93 वर्षांचे होते. चार दिवसांपूर्वीच त्यांचा 93 वा वाढदिवस पार पडलेला होता. त्यांच्या मागे पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, अभिनय आणि अजिंक्य ही मुले असा परिवार आहे.

ठाकूर ते देव!

30 जानेवारी 1929 रोजी वर्ध्यात जन्मलेले देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले. देव यांचे घराणे राजस्थानातील ठाकूर; पण त्यांच्या वडिलांचा आणि शाहू महाराजांचा स्नेहभाव मोठा होता, यातून खुद्द महाराजांनी त्यांच्या वडिलांना ‘देव’ संबोधल्याने पुढे देव हेच त्यांचे आडनाव झाले.

1951 मध्ये ‘पाटलाची पोर’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर राजा परांजपे दिग्दर्शित ‘आंधळा मागतो एक डोळा’मध्ये त्यांनी पहिल्यांदा खलनायक रंगवला. मराठीत भूमिका करतानाच त्यांच्यासाठी 1962 साली हिंदी चित्रपटसृष्टीचाही पडदा उघडला. राजश्री प्रॉडक्शनचा ‘आरती’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

‘वरदक्षिणा’ या मराठी चित्रपटात नलिनी सराफ यांच्यासमवेत भूमिका साकारताना त्यांच्याशी रमेश देव यांची प्रेमगाठ जुळली. त्यातूनच ते विवाहबद्ध झाले. पडद्याइतकीच प्रत्यक्षातील सहजीवनातही सुसंवादी जोडी म्हणून रमेश आणि सीमा देव हे तीन पिढ्यांचे आदर्श होते.

त्यांच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव 2013 मध्ये उत्साहात साजरा झाला. रसिकांच्या मनावर अधिराज्य करणार्‍या या मराठमोळ्या जोडीवर रसिकांनी जीवापाड प्रेम केले. त्यांची दोन्ही मुले ही करमणूक क्षेत्रातच कार्यरत आहेत. अजिंक्य देव यांनी अनेक मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या, तर अभिनय देव हे निर्मितीच्या क्षेत्रात स्थिरावले. रमेश देव प्रॉडक्शन हाऊसतर्फे दर्जेदार जाहिरात आणि चित्रपटांची निर्मिती केली जात आहे.

देव यांनी सुमारे 250 हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या. 30 जानेवारी 1929 रोजी वर्ध्यात जन्मलेले देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले. देव यांचे घराणे राजस्थानातील ठाकूर; पण त्यांच्या वडिलांचा आणि शाहू महाराजांचा स्नेहभाव मोठा होता, यातून खुद्द महाराजांनी त्यांच्या वडिलांना ‘देव’ संबोधल्याने पुढे देव हेच त्यांचे आडनाव झाले.

1951 मध्ये ‘पाटलाची पोर’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. त्यानंतर राजा परांजपे दिग्दर्शित ‘आंधळा मागतो एक डोळा’मध्ये त्यांनी पहिल्यांदा खलनायक रंगवला. मराठीत भूमिका करतानाच त्यांच्यासाठी 1962 साली हिंदी चित्रपटसृष्टीचाही पडदा उघडला. राजश्री प्रॉडक्शनचा ‘आरती’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.‘वरदक्षिणा’ या मराठी चित्रपटात नलिनी सराफ यांच्यासमवेत भूमिका साकारताना त्यांच्याशी रमेश देव यांची प्रेमगाठ जुळली. त्यातूनच ते विवाहबद्ध झाले. पडद्याइतकीच प्रत्यक्षातील सहजीवनातही सुसंवादी जोडी म्हणून रमेश आणि सीमा देव हे तीन पिढ्यांचे आदर्श होते.

त्यांच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव 2013 मध्ये उत्साहात साजरा झाला. रसिकांच्या मनावर अधिराज्य करणार्‍या या मराठमोळ्या जोडीवर रसिकांनी जीवापाड प्रेम केले. त्यांची दोन्ही मुले ही करमणूक क्षेत्रातच कार्यरत आहेत. अजिंक्य देव यांनी अनेक मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या, तर अभिनय देव हे निर्मितीच्या क्षेत्रात स्थिरावले. रमेश देव प्रॉडक्शन हाऊसतर्फे दर्जेदार जाहिरात आणि चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. देव यांनी सुमारे 250 हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या.

राजेश खन्‍ना, अमिताभ बच्चनसमोर रमेश देव!
‘बिग बी’ अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार राजेश खन्‍ना यांच्यासमवेत केलेल्या ‘आनंद’ चित्रपटातील रमेश आणि सीमा देव यांची भूमिका अजरामर ठरली. सीमा देव या आपल्या मानलेल्या बहिणीला आशीर्वाद देताना कर्करोगामुळे अखेरचे दिवस कंठत असलेला आनंद (राजेश खन्‍ना) ‘अब तुम्हे क्या आशीर्वाद दू, मैं ये भी तो नहीं कह सकता ना, कि मेरी उमर तुम्हे लग जाये, असे म्हणतो तेव्हा लगतच उभे असलेल्या रमेश देव यांच्या डोळ्यांतील संवादरहित करुण भाव आजही भाव खाऊन जातात.

देव यांचे गाजलेले चित्रपट
राम राम पाव्हणं, शारदा, पाटलाचं पोर, महाराणी येसुबाई, ये रे माझ्या मागल्या, कुलदैवत, पसंत आहे मुलगी, पायदळी पडलेली फुले, गाठ पडली ठकाठका, देवघर, आंधळा मागतो एक डोळा, देवाघरचे लेणं, आई मला क्षमा कर, सात जन्माचे सोबती, मानिनी, सप्‍तपदी, एक धागा सुखाचा, अवघाचि संसार, जगाच्या पाठीवर, पैशाचा पाऊस, बाप-बेटे, वरदक्षिणा, सोन्याची पावले, प्रेम आंधळे असते, उमज पडेल तर, आरती, बाप माझा ब्रह्मचारी, भाग्यलक्ष्मी, चार दिवस सासूचे… चार दिवस सुनेचे, अन्‍नपूर्णा, मोलकरीण, शेवटचा मालुसरा, अपराध, आनंद, आहट, काळी बायको, मुजरीम, खिलौना, परदेश, पत्नी, चिंगारी, तिथे नांदते लक्ष्मी, कोशिश, जोरू का गुलाम, रामपूरका लक्ष्मण, ललकार, संजोग, बनफूल, मुनीमजी, कोरा कागज, या सुखानो या, प्रायश्‍चित्त, पारध, पतिता , कशासाठी … प्रेमासाठी अशा विविध चित्रपटांसह त्यांनी गेल्या काही चिमणी पाखरं, चल गंमत करू, तिन्ही सांजा, लग्‍नानंतरची गोष्ट, राजकारण, पिपाणी, जॉली एलएल.बी., वेल डन भाल्या, तात्याराव लहाने यासारख्या चित्रपटात गेल्या दोन दशकांत विविध चित्रपटात भूमिका साकारल्या.

रमेश देव यांच्यासोबत वेल डन भाल्या, सानेगुरुजी आदी चित्रपटांत भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटसृष्टीत मराठी आणि हिंदी दोन्हीत एवढी मोठी कारकीर्द लाभलेले रमेश देव भेटले म्हणजे अतिशय नम्रपणे, आस्थेने चौकशी करायचे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत
या दाम्पत्याला फार मोठा आदर मिळाला. अत्यंत शिस्तप्रिय, उत्तम पाठांतर आणि सहकलाकारांची काळजी घेणारे असे ते व्यक्‍तिमत्त्व होते.
– अलका कुबल, अभिनेत्री

रमेश देव मला धाकट्या भावासारखेच मानायचे. मी त्यांना रमेश भय्याच म्हणायचो. 1967 मध्ये माझे चित्रपटसृष्टीतील पहिले चित्रीकरण ‘आयलंय दर्याला तुफान’ या चित्रपटात त्यांच्यासोबत झाले; पण तो चित्रपट लगेच प्रदर्शित झाला नाही. माझी नाटके, चित्रपट ते आवर्जून पाहायचे. त्याचे कौतुक ते करायचे. माझे आणि त्यांचे नाते खूप छान होते. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे
– अशोक सराफ, अभिनेता

Back to top button