पुष्पा : नेहा कक्कड हिने 'ऊ अंटावा'वर सामंथाला दिली टक्कर (Video) | पुढारी

पुष्पा : नेहा कक्कड हिने 'ऊ अंटावा'वर सामंथाला दिली टक्कर (Video)

पुढारी ऑनलाईन

सोशल मीडियावर सध्या साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुचं गाणं ऊ अंटावाची चर्चा रंगलीय. चाहते ते स्टार्सपर्यंत प्रत्येक जण या गाण्यावर रील आणि व्हिडिओ करत आहेत. आता बॉलीवूड गायिका नेहा कक्कड देखील या गाण्याच्या प्रेमात पडलीय. नेहा कक्कड हिनेदेखील वाळूत या गाण्यावर डान्स केलाय.

नेहाने एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती सुंदर डान्स करताना दिसतेय. तिचा हा रील इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.

नेहाने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती निळ्या आकाशाखाली, बीच किनारी ‘ऊ अंटावा’ वर थिरकताना दिसते. व्हिडिओमध्ये नेहाने सामंथाचे डान्स स्टेप आणि एक्सप्रेशनला कॉपी केलं आहे आणि सिजलिंग परफार्मन्स दिली आहे.

रीलमध्ये नेहाने ब्लू कलरचा मिरर सीक्वेंस ड्रेस गातला आहे. यासोबत तिने ट्रॅडिशनल झुमके घातले आहे. पोस्ट शेअर करत नेहाने लिहिलंय, “चित्रपट पुष्पा, परफॉर्मन्स आणि याचं संगीत मला खूप आवडलं. मला वाटलं की, मी माझं ॲप्रिसिएशन दाखवण्यासाठी कमीत कमी इतकं तर काम करू शकते.”

नेहाचा हा व्हिडिओ फॅन्सना खूप आवडला आहे. एका फॅनने कमेंट करत लिहिलंय, “नेहा, तू करोडोंमध्ये एक आहेस.” तर आणखी एका युजरने लिहिलंय, “सुपर टॅलेंटेड हॉटी”.

नेहाचं सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.इन्स्टाग्रामवर तिचे  ६७ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. नेहादेखील मजेशीर पोस्ट करत राहते. नेहा उत्तम गायिकेबराेबर चांगली डान्सरदेखील आहे. तिचा हा लेटेस्ट डान्स व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.  नेहाशिवाय आतापर्यंत भारती सिंह, संभावना सेठ, ऐश्वर्या शर्मा, आयशा सिंह अन्य स्टार्सनी देखील पुष्पा चित्रपटातील डायलॉग्स आणि गाण्यांवर व्हिडिओज केले आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button