‘एमआय-7 आणि 8’च्या रीलिज डेट जाहीर | पुढारी

‘एमआय-7 आणि 8’च्या रीलिज डेट जाहीर

पुढारी ऑनलाईन

हॉलीवूड अभिनेता टॉम क्रुझचा जगभरात स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. त्याच्या ‘मिशन इम्पॉसिबल’ या चित्रपट फ्रँचायजीचे तर कोट्यवधी चाहते भारतात आहेत. पन्‍नाशी ओलांडूनही या फ्रँचायजीतील अनेक अवघड अ‍ॅक्शन सीक्वेन्सेस स्वतः टॉम करत असतो. त्यामुळेही चाहत्यांना त्याच्याविषयी आदर वाटतो. याच फ्रँचायजीतील ‘मिशन इम्पॉसिबल 7’ आणि ‘मिशन इम्पॉसिबल 8’ च्या नव्या रीलिज डेट आता समोर आल्या आहेत. या चित्रपटांचे प्रदर्शन पुन्हा पुढे ढकलले गेले आहे. नव्या तारखांनुसार ‘एमआय-7’ 14 जुलै 2023 रोजी प्रदर्शित होईल, तर ‘एमआय 8’ 28 जून 2024 रोजी रीलिज होईल. या दोन्ही पार्टस्चे दिग्दर्शन ख्रिस्तोफर मॅक्वायरे करत आहे.

Back to top button